भूविज्ञान मंत्रालय

देशात यावर्षी नैऋत्य मौसमी पावसाचे प्रमाण सर्वसाधारण सरासरी एवढे म्हणजे दीर्घ कालावधीसाठी सरासरी पर्जन्यमान (LPA) 96 ते 104 टक्के एवढे राहील असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज


देशात जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा मौसमी पाऊस साधारणतः दीर्घ कालावधीसाठी सरासरी पर्जन्यमानाच्या (LPA) 101 टक्के एवढा होईल, असा हवामान खात्याचा अंदाज

Posted On: 01 JUN 2021 4:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जून 2021


भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार देशात जून ते सप्टेंबर महिमान महिन्यांत दरम्यान पडणारा नैऋत्य मोसमी पाऊस हा सर्वसाधारण सरासरीएवढा म्हणजेच दीर्घ कालावधीसाठी सरासरी पर्जन्यमानाच्या  (LPA)  96 ते 104 टक्के होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे.

  1. नेमकेपणाने सांगायचे झाल्यास जून ते सप्टेंबर दरम्यान देशात पडणारा नैऋत्य मोसमी पाऊस हा यावर्षी पावसाच्या दीर्घकालीन सरासरीच्या 101% एवढा होईल.
  2. या अंदाजात 4 टक्के अधिक उणे. एवढी त्रुटी असू शकेल. 1961-2010 या मोठ्या कालखंडात देशातील नैऋत्य मोसमी पावसाची सरासरी 88 सेन्टी मीटर होती. देशातील चार एकसंध भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण असेल.
  3. वायव्य भारतात 92 ते 108 टक्के, दक्षिण द्वीपकल्पात 93 टक्के ते 107 टक्के. मोसमी पावसाचे ईशान्य भारतातील  प्रमाण सरासरीहून कमी म्हणजेच 95% हून कमी तर मध्य भारतात  सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्केहून जास्त असेल असा अंदाज आहे.
  4. मुख्यत्वे मोसमी पावसावर अवलंबून असणाऱ्या आणि मोसमी पावसावर आधारित शेती असणाऱ्या भागात नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीहून जास्त म्हणजे सरासरीच्या 106 टक्के  होईल.
  5. मोसमी पाऊस सर्वसाधारणपणे सर्वदूर (आकृती 1) व्यवस्थित पडेल.  या मोसमात देशातील बहुतेक भागात सरासरीएवढा किंवा त्याहून जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे.
  6. आधुनिक जागतिक हवामान प्रतिकृतीनुसार केल्या जाणाऱ्या हवामान अंदाजावरून विषुववृत्तीय पॅसिफिक समुद्रात एल निनो तसेच दक्षिण दोलन परिस्थिती  आहे तशीच राहिल्याने हिंदी महासागरातील IOD म्हणजेच हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान दोलनात नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.

 

(इंग्लिश मधून अधिक माहिती तसेच ग्राफिक्स साठी इथे क्लिक करा)

(हिंदी मधून अधिक माहिती तसेच ग्राफिक साठी इथे क्लिक करा)

 

विशिष्ट विभागातील पावसाचा अंदाजासाठी मौसम ॲप डाऊनलोड करा. पिकांच्या दृष्टीने हवामान अंदाज तसेच सल्ला यासाठी मेघदूत ॲप डाऊनलोड करा. वीजांसंबंधी पूर्व सूचनेसाठी दामिनी ॲप डाऊनलोड करा. तसेच जिल्हानिहाय सूचनेसाठी  संबंधित राज्याच्या MC/RMC  संकेत स्थळाला  भेट द्या.

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1723416) Visitor Counter : 427