संरक्षण मंत्रालय

व्हाइस अॅडमिरल रवणित सिंग एव्हीएसएम, एनएम यांनी नौदलाचे डेप्युटी चीफ म्हणून पदभार स्विकारला

Posted On: 01 JUN 2021 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जून 2021

 

व्हाइस अॅडमिरल रवणित सिंग एव्हीएसएम, एनएम यांनी नौदलाचे डेप्युटी चीफ म्हणून 01 जून 2021 रोजी पदभार स्विकारला. भारतीय नौदलात त्यांची 01 जून 1983 मधे नियुक्ती झाले होती. ते विमान क्षेत्रातले तज्ञ आहेत. ध्वजाधिकारी, मास्टर ग्रीन इंस्ट्रुमेंट रेटींगने फ्लाईंग प्रशिक्षक म्हणून मान्यताप्राप्त आहेत.

त्यांनी आपल्या कार्यकाळात एचटी-2, किरण एचजेटी 16, टीएस 11 इस्कारा, हंटर, हॅरीअर जीआर 3, जेट प्रोवोस्ट, चेतक, गाझेल, हॉक आणि मिग 29 केयूबी या लढावू विमानांचे उड्डाण केले आहे.

नौदलाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी विविध आव्हानात्मक कार्मिक तसेच मुत्सद्दी पातळीवरच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. आघाडीवरील विविध युद्धनौका आणि विमानवाहू युद्धनौकांवर महत्वाची जबाबदारी त्यांनी बजावली आहे. यात

आएनएस हिमगिरी, आयएनएस रणविजय, आयएनएस रणवीर, आयएनएएस 551बी, आयएनएएस 300 यासह प्रिमियर हवाईतळ आएनएस हंसा यांचा समावेश आहे. 

व्हाइस अॅडमिरल रवणित सिंग यांना 2000 साली चीफ ऑफ द नेवल स्टाफ सन्मानाने गौरवण्यात आले होते. तसेच 2004 मधे नौसेना पदक आणि 2017 मधे अतिविशिष्ट सेवा पदकाने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

व्हाइस अॅडमिरल एमएस पवार 31 मे 2021 रोजी निवृत्त झाले, सिंग यांनी त्यांच्याकडून पदभार स्विकारला.

 

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1723409) Visitor Counter : 22


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil