रेल्वे मंत्रालय
ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे देशभरात 21939 मेट्रीक टनापेक्षा जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा
महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचवला
Posted On:
31 MAY 2021 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मे 2021
सर्व अडथळे पार करत आणि अडचणींवर नवे उपाय शोधत देशभरातील विविध राज्यांना द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा करून दिलासा देण्याचा भारतीय रेल्वेचा प्रवास सुरूच आहे. आतापर्यंत ,भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना 1304 हुन अधिक टँकर्सच्या माध्यमातून 21,939 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजनचा पुरवठा केला आहे.
याची नोंद घ्यावी लागेल की, आतापर्यंत , 321ऑक्सीजन एक्स्प्रेसने आपला प्रवास पूर्ण करत विविध राज्यांना दिलासा दिला आहे.
हे पत्रक जारी होईपर्यंत, 46 टँकर्समधून 827 मेट्रीक टनापेक्षा जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन घेऊन जाणाऱ्या 11 ऑक्सिजन एक्स्प्रेस मार्गस्थ होऊन धावत आहेत.
हे पत्रक जारी होईपर्यंत, ऑक्सीजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्राला 614 मेट्रीक टन ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात आला आहे.
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723263)
Visitor Counter : 156