श्रम आणि रोजगार मंत्रालय

औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (2016-100) - एप्रिल, 2021

Posted On: 31 MAY 2021 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2021

 

प्रमुख मुद्दे-

  1. औद्योगिक कामगारांसाठी  अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक

(2016=100) मार्च 2021मधील 119.6 अंकांच्या तुलनेत वाढून एप्रिल 2021 मध्ये 120.1 अंक इतका झाला.

  1. मुख्यत्वेकरून खालील वस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे हा निर्देशांक  वाढला आहे.

तूर डाळ, मसूर डाळ, ताजे मासे, बकऱ्याचे मटन, पोल्ट्रीमधील कोंबड्या, कोंबडीची अंडी, खाद्यतेले, सफरचंदे, केळी, द्राक्षे, लिची, संत्री, पपई, चहापत्ती, तयार गरम चहा, न्हावी/सौन्दर्यतज्ज्ञांचे शुल्क, फुले/फुलांचे हार, डॉक्टरांचे शुल्क, रेल्वेभाडे, दुचाकींचे सर्व्हिसिंग शुल्क, केबल टी व्ही शुल्क, इ.

  1. गेल्या महिन्यातील महागाई दर 5.64 टक्के होता, त्याच्या तुलनेत एप्रिल 2021 साठी महागाई दर 5.14 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. खाद्यान्नांचा महागाई दरही गेल्या महिन्यातील 5.36 टक्के दरापेक्षा खाली येऊन 4.78 टक्के  झाला आहे.

एप्रिल 2021 चा औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक 0.5 अंकांनी वाढून 120.1 (एकशे वीस पूर्णांक एक) झाला आहे. एक महिन्यातील टक्केवारी बदलानुसार तो गेल्या महिन्याच्या तुलनेत 0.42 टक्क्यांनी वाढला असून गेल्या वर्षातील याच काळातील वाढ 0.92 टक्के होती. प्रति वर्षीच्या  ( Y oY ) महागाई दराप्रमाणे  गेल्या महिन्याच्या 5.64 टक्के दराच्या तुलनेत या महिन्याचा महागाई  दर 5.14 टक्के होता, तसेच गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात हाच दर 5.45 टक्के होता. त्याचप्रमाणे खाद्यान्न महागाई दर गेल्या महिन्यातील 5.36 टक्के दराच्या तुलनेत या महिन्यात 4.78 टक्के इतका खाली आला असून, गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात तो 6.56 टक्के होता.

प्रतिवर्षी प्रमाणे औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक वर आधारित  महागाई दर (खाद्यान्न व सर्वसाधारण)

औद्योगिक कामगारांसाठी  अखिल भारतीय गट निहाय ग्राहक किंमत निर्देशांक - मार्च व एप्रिल 2021 साठी.

Sr. No.

Groups

March, 2021

April, 2021

I

Food & Beverages

118.0

119.1

II

Pan, Supari, Tobacco & Intoxicants

136.5

137.3

III

Clothing & Footwear

118.7

119.0

IV

Housing

115.2

115.2

V

Fuel & Light

149.2

148.7

VI

Miscellaneous

118.1

118.3

 

General Index

119.6

120.1

औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक: गट निर्देशांक

मे 2021 चा औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक बुधवार, 30 जून 2021 रोजी जाहीर केला जाईल. तो पुढे दिलेल्या कार्यालयीन संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल. www.labourbureaunew.gov.in.

ताज्या निर्देशांकाबद्दल बोलताना श्रम व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष गंगवार म्हणाले, कि,"या निर्देशांकातील वाढीमुळे कामगारांचा महागाई भत्ता वाढेल व  त्यांचे वेतन वाढण्यास मदत होईल."

S.Tupe/U.Raikar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1723167) Visitor Counter : 363


Read this release in: English , Urdu , Urdu , Hindi , Tamil