नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेला कोविड वर्षात विक्रमी नफा
Posted On:
30 MAY 2021 9:25PM by PIB Mumbai
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील सार्वजनिक उद्यम भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेने (IREDA) 2020-21 या कोविड 19 मुळे प्रभावित झालेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक 570 कोटी रुपये करपूर्व नफा (PBT) नोंदवला आहे. 2019-20 मध्ये कंपनीचा करपूर्व नफा 241 कोटी रुपये होता. कंपनीने करानंतरचा नफा 346 कोटी एवढा नोंदवला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षात 215 कोटी होता, अशाप्रकारे कंपनीने 61% एवढी भरघोस वाढ नोंदवली आहे.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723007)
Visitor Counter : 128