ऊर्जा मंत्रालय

कोविड19 महामारीच्या काळात पॉवरग्रीड पुरवत आहे आवश्यक पायाभूत सुविधा

Posted On: 29 MAY 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 मे 2021

 

कोविड-19 महामारी विरोधातल्या देशाच्या लढ्यात उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतली सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आघाडीवर राहून काम करत आहे. देशभरातील विविध राज्यात व्यापक प्रमाणावर सहकार्य करत आहे. 

आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुविधा पुरवण्याचे काम पॉवरग्रीड समर्पित वृत्तीने करत आहे. त्यांनी शीत साखळीतील उपकरणे अर्थात कोल्ड चेन इक्विपमेंट (181 आईस लाईन्ड रेफ्रिजरेटर्स आणि 130 डीप फ्रिझर्स) पंजाब, सिक्कीम, मिझोरम ही राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेश लद्दाखला कॉर्पोरेट सामाजिक दायित्वा अंतर्गत दिले आहेत. यांची किंमत 2.66 कोटी रुपये आहे. 

लेह, लद्दाखच्या दुर्गम भागात कोविड19 प्रतिबंधक लसीकरणासाठी दोन उष्णतारोधक व्हॅन देखील उपलब्ध केल्या आहेत. 

जबाबदार कॉर्पोरेट समूह या नात्याने पॉवरग्रीड सातत्याने आरोग्याची काळजी घेणाऱ्या उपक्रम आणि प्रकल्पात गुंतवणूक करत असते. समाजाचे देणं फेडण्याचे तत्वज्ञान अंगिकारत त्यांनी विश्राम सदनांची (रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी विश्रामगृह) उभारणी केली आहे. तसेच मुंबई आणि गुवाहाटी इथे ALS रुग्णवाहीका पुरवून कर्करुग्णांसाठीच्या सुविधा वाढवल्या आहेत. देशभरातील  अनेक रुग्णालये/पीएचपी/सीएचपी यांनाही महत्वाच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.  


* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722722) Visitor Counter : 118