रेल्वे मंत्रालय
देशातील 15 राज्यातील 39 शहरे/नगरांमधील 41 स्थानकांपर्यंत पोहोचली ऑक्सिजन एक्सप्रेस
ऑक्सिजन एक्सप्रेसने देशात 19408 मेट्रीक टनापेक्षा जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा केला पुरवठा
Posted On:
28 MAY 2021 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2021
सर्व अडथळे पार करत आणि अडचणींवर नवे उपाय शोधत भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करून दिलासा दिला आहे. आतापर्यंत, भारतीय रेल्वेने देशभरातील विविध राज्यांना 1162 हून अधिक टँकर्सच्या माध्यमातून 19408 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेसने मिशन मोडवर आतापर्यंत, देशातील 15 राज्यांमधील सुमारे 39 शहरे/नगरांमध्ये द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेसने 39 शहरे/नगरांमधील 41 स्थानकांपर्यंत द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) पोहोचवला आहे.
आतापर्यंत, 289 ऑक्सिजन एक्स्प्रेसने आपला प्रवास पूर्ण करत विविध राज्यांना दिलासा दिला आहे, याची दखल घ्यावी लागेल.
हे पत्रक जारी होईपर्यंत, 50 टँकर्समध्ये 865 मेट्रीक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या 11 ऑक्सिजन एक्स्प्रेस मार्गस्थ होऊन धावत आहेत.
याचा उल्लेख करावा लागेल की, 34 दिवसांपूर्वी रेल्वेने 24 एप्रिलपासून ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास सुरु असून पहिल्यांदा महाराष्ट्राला 126 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.
हे पत्रक जारी होईपर्यंत, महारष्ट्रात 614 मेट्रीक टन ऑक्सिजन पोहोचविण्यात आला असून सुमारे 3731 मेट्रिक टन उत्तर प्रदेशात, मध्य प्रदेशात 656 मेट्रीक टन, दिल्लीत 5185 मेट्रीक टन, हरयाणात 1967 मेट्रीक टन, राजस्थानमध्ये 98 मेट्रिक टन, कर्नाटकात 1773 मेट्रीक टन, उत्तराखंडमध्ये 320 मेट्रीक टन, 1554 मेट्रीक टन तामिळनाडूमध्ये, आंध्रप्रदेशमध्ये 1268 मेट्रिक टन, पंजाबमध्ये 225 मेट्रीक टन, केरळमध्ये 380 मेट्रीक टन, 1432 मेट्रीक टन तेलंगणामध्ये, झारखंडमध्ये 38 मेट्रीक टन आणि आसाममध्ये 160 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.
भारतीय रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विविध मार्ग निश्चित केले आहेत आणि कोणत्याही राज्याला आवश्यकता भासल्यास त्या राज्यात ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवले आहे.
ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या आणखी ऑक्सिजन एक्सप्रेसचा प्रवास आज रात्रीनंतर सुरु होणे अपेक्षित आहे.
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722507)
Visitor Counter : 221