संरक्षण मंत्रालय
डीआरडीओने एरोइंजिन्ससाठी क्रिटिकल नियर आयसोथर्मल फोर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले
Posted On:
28 MAY 2021 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2021
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ने 2000 मे.टन आयसोथर्मल फोर्ज प्रेसचा वापर करून अवघड अशा टिटॅनियम मिश्रणापासून उच्च-दाबाचे कॉम्प्रेसर्स (एचपीसी) च्या पाचही टप्प्याचे उत्पादन करण्यासाठी निअर आइसोथर्मल फोर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. हैदराबाद येथील डीआरडीओच्या डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (डीएमआरएल) या प्रमुख मेटलर्जिकल प्रयोगशाळेत हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. एयरोइंजिन तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. या विकासासह, भारत अशा महत्वपूर्ण एअरो इंजिन घटकांची उत्पादन क्षमता असणाऱ्या मर्यादित जागतिक इंजिन विकासकांच्या लीगमध्ये सामील झाला आहे.
मोठ्या प्रमाणात उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी, तंत्रज्ञान हस्तांतरण (एलएटीओटी) परवाना कराराद्वारे डीएमआरएल तंत्रज्ञान मेसर्स मिधानी कंपनीला हस्तांतरित करण्यात आले.
भारतात, ओईएमबरोबर परवानाधारक उत्पादन कराराअंतर्गत एचएएल (ई), बंगळुरू हे अडोर इंजिनची दुरुस्ती करत आहेत. कोणत्याही एरोइंजिनप्रमाणेच, एचपीसी ड्रम असेंब्ली देखील निर्दिष्ट केलेल्या परिचालनानंतर किंवा नुकसान झाले तर बदलली पाहिजे. या उच्च मूल्याच्या एचपीसी डिस्कची वार्षिक आवश्यकता बरीच मोठी असून स्वदेशीकरणाची हमी देतात. एचपीसी ड्रम ही उच्च दाबाची सब-असेंब्ली आहे आणि वाढीव तापमानात ती हळूहळू पुढे सरकते. एचपीसी ड्रम साठी कच्चा माल आणि फोर्जिंग उच्च दर्जाची असणे आवश्यक आहे जे स्थिर आणि गतिशील यांत्रिक गुणधर्मांचे विशिष्ट संयोजन पूर्ण करू शकेल.
डीएमआरएलने विविध विज्ञान आणि ज्ञान-आधारित साधनांचे एकीकरण करून हे फोर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. डीएमआरएलने स्वीकारलेली कार्यपद्धती सर्वसमावेशक स्वरुपाची आहे आणि इतर एरोइंजिन घटक विकसित करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. या पद्धतीचा वापर करून तयार केलेले कंप्रेसर डिस्क्स इच्छित अनुप्रयोगासाठी उड्डाणासाठी पात्र एजन्सीद्वारे निर्धारित केलेल्या सर्व गरजा पूर्ण करतात.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, उद्योग जगत आणि या महत्वपूर्ण एअरो इंजिनशी संबंधित तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये सामील असलेल्या इतर सर्व संस्थांच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1722466)
Visitor Counter : 304