ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग 15 जून 2021 पासून सुरू होणार
Posted On:
24 MAY 2021 10:13PM by PIB Mumbai
सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग 15 जून 2021 पासून सुरू होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सोनारांना अंमलबजावणीसाठी तयार होण्यास आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी आणखी काही वेळ देण्याची हितधारकांची विनंती सरकारने मान्य केली. यापूर्वी 1 जून 2021 पासून याची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते.
योग्य समन्वय साधून अंमलबजावणी करण्याच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. महासंचालक प्रमोद तिवारी (बीआयएस) समितीचे संयोजक असतील. ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे आणि सोनार संघटना, व्यापार, हॉलमार्किंग संस्था इत्यादींचे प्रतिनिधी समिती स्थापन करणार आहेत.
सुवर्ण अलंकारांमध्ये भारताला जागतिक दर्जा असणे आवश्यक आहे असे यावेळी गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले की, ग्राहकांना यापुढे अधिक विलंब टाळून देशभरात सर्वत्र हॉलमार्कने प्रमाणित सोने लवकरात लवकर मिळाले पाहिजे.
सुवर्ण अलंकारात अनिवार्य हॉलमार्किंगच्या अंमलबजावणीतील प्रगतीबाबत भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भारतीय मानक ब्युरोच्या वतीने आयोजित वेबिनार आणि परिषदेत गोयल आढावा घेत होते.
***
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721419)
Visitor Counter : 204