केंद्रीय लोकसेवा आयोग
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I) 2020 चे अंतिम निकाल
Posted On:
24 MAY 2021 8:02PM by PIB Mumbai
केंद्रीय लोक सेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I) 2020 आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या निकालानुसार, जे 147 (96*+51^) विद्यार्थी गुणवत्तेनुसार अंतिमतः पात्र ठरले आहेत त्यांची यादी खाली दिली आहे. (i) *अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई, येथे 113 वा लघु सेवा अभ्यासक्रम (पुरुषांसाठी) (ii) ^अधिकारी प्रशिक्षण अकादमी चेन्नई येथे 27 वा स्त्रियांसाठीचा लघु सेवा (बिगर-तांत्रिक) अभ्यासक्रम या एप्रिल 2021 मध्ये सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. 113 व्या लघु सेवा अभ्यासक्रमासाठीच्या (पुरुषांसाठी) यादीत यापूर्वी देहराडूनची भारतीय लष्करी अकादमी, केरळच्या एझिमला येथील नौदल अकादमी आणि हैदराबाद येथील हवाई दल अकादमी (उड्डाण-पूर्व) प्रशिक्षण अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी याच परीक्षेतील निकालांवरून ज्या विद्यार्थ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली त्यांचीदेखील नावे समाविष्ट आहेत.
निकालासाठी येथे क्लिक करा:
***
M.Chopade/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721370)
Visitor Counter : 193