वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

म्हशीच्या मांसा संदर्भात भारत आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मार्गदर्शक सूचना तसेच गुणवत्ता, अन्न सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीचे पालन करत आहे


भारतीय फ्रोझन बोनलेस बफेलो मांस सुरक्षित आहे- एपीईडीए

Posted On: 20 MAY 2021 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2021

 

भारत म्हशीच्या मांसची निर्यात करणाऱ्या जगातील अग्रगण्य देशांपैकी एक आहे.  कोविड --19 महामारीला  एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही , 2020-21 वर्षात भारताची निर्यात 3.17 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे जी मागील वर्षाच्या निर्यातीएवढीच (2019-20).आहे. म्हशीच्या मांसाचे मूल्यही 2,754 डॉलर वरून वाढून  2,921 डॉलर प्रति मेट्रिक टनवर  गेले. जगातील 70 हून अधिक देशांमध्ये पौष्टिक आणि जोखीम नसलेले म्हशीचे मांस अतिशय लोकप्रिय आहे. हाँगकाँग, व्हिएतनाम, मलेशिया, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, सौदी अरेबिया, फिलीपिन्स आणि युएई हे भारतीय  म्हशीचे मांस आयात करणारे प्रमुख देश आहेत. कोणतीही जोखीम कमी करण्यासाठी म्हशीचे मांस ओआयई मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुसार तयार आणि निर्यात केले जाते. भारतातून सुरक्षित आणि जोखीम मुक्त बोनलेस म्हशीच्या मांसाच्या निर्यातीलाच केवळ  परवानगी आहे.

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या  कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणने (आपेडा) असे म्हटले आहे की सर्व आयात करणारे देश सुरक्षितपणे भारतीय म्हशींच्या फ्रोझन बोनलेस मांसाची खरेदी करू शकतात. भारतातून म्हशीच्या मांसाची निर्यात सुरळीत सुरू असून पुरवठा साखळीत कोणतेही अडथळे नाहीत. किफायतशीर किमतीचे म्हशीचे मांस आयातदार देशांमध्ये अन्न सुरक्षा आणि अन्नधान्य महागाई नियंत्रणात  हातभार लावत आहे.

पशुधन रोगांचे नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या  आहेत. 2030 पर्यंत लसीकरण आणि रोग निर्मूलन आणि 2025 पर्यंत फुट आणि माऊथ रोग अर्थात खुरकत आणि लाळ्या (एफएमडी) आणि ब्रुसेलोसिस नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाची  (एनएडीसीपी) जून, 2019 मध्ये सुरुवात  ही केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या आजारांना  पूर्णपणे आळा घालण्यासाठी आणि  त्यांच्या निर्मूलनासाठी, लसीचा  100% खर्च केंद्र सरकार उचलत असून  त्यासाठी रु. 13,343 कोटी रुपये तरतूद केली आहे.  या कार्यक्रमांतर्गत  लसीकरण केलेल्या सर्व प्राण्यांना ईअर  टॅग केले आहे आणि त्यामुळे  त्यांचा  संपूर्ण शोध घेणे शक्य आहे.  याव्यतिरिक्त, सरकार खुरकत आणि लाळ्या सारख्या आर्थिकदृष्ट्या  महत्त्वाच्या पशुधन रोगांच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि नियंत्रणासाठी अनेक योजना राबवत आहे.  ओआयई टेरिस्ट्रियल एनिमल हेल्थ कोडच्या तरतुदीनुसार भारताच्या अधिकृत एफएमडी कंट्रोल प्रोग्रामला ओआयईची मान्यता मिळाली आहे. 

जागतिक दर्जाची  मांस प्रक्रियेची पायाभूत सुविधा भारतात उपलब्ध आहे, जी गुणवत्ता व्यवस्थापन, अन्न सुरक्षा व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणालींसाठी प्रमाणित आहे.

ओआयई, डब्ल्यूएचओ आणि एफएओ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की अन्न किंवा खाद्य पॅकेजिंगद्वारे कोविड -19 चा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे. कोविड -19  हा एक श्वसन रोग आहे आणि व्यक्तीकडून व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो.  या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय मांस प्रक्रिया आस्थापना शारीरिक अंतर, कडक स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपाययोजनाचे काटेकोर पालन करत  आहेत. कर्मचारी व कामगार यांना अन्न सुरक्षा पद्धतींबद्दल नियमित प्रशिक्षण दिले जाते


* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720256) Visitor Counter : 178