ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

गेल्या वर्षी याच कालावधीतील खरेदीच्या तुलनेत गहू खरेदीत 30% वाढ


रब्बी विपणन हंगाम 2021-22 मध्ये 366.61 लाख मेट्रीक टन गहू 37.15 लाख शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी

742.41 लाख मेट्रीक टन धानाची रब्बी विपणन हंगाम 2021-22 मध्ये हमीभावाने खरेदी, 111.00 लाख शेतकऱ्यांना लाभ

सरकारने नोडल मध्यस्थांमार्फत 6,69,411.32 मेट्रीक टन डाळी आणि तेलबियांची हमीभावाने केली खरेदी,  4,01,265 शेतकऱ्यांना लाभ

प्रविष्टि तिथि: 15 MAY 2021 9:43PM by PIB Mumbai

 

सध्याच्या 2021-22 च्या रब्बी विपणन हंगामातील गहू खरेदी आधीच्या सत्राप्रमाणे हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली व जम्मू काश्मीरमधून हमीभावाने सुरू आहे त्यानुसार आतापर्यंत म्हणजे 14.05.2021 पर्यंत 366.61 लाख मेट्रीक टन गहू हमीभावाने खरेदी करण्यात आला. गतवर्षी याच कालावधीत हमीभावाने 282.69 लाख मेट्रीक टन गहूखरेदी झाली होती. या रब्बी विपणन हंगामात एकूण 72,406.11 कोटी रुपयांची खरेदी झाली ज्याचा लाभ  37.15 लाख शेतकऱ्यांना झाला.

 

रब्बी विपणन हंगाम 2020-21 मध्ये धान खरेदी व्यवहार सुरळीत सुरू आहेत. खरेदी करणाऱ्या राज्यांमधून आतापर्यंत म्हणजे 14.05.2021 पर्यंत 742.41 लाख मेट्रिक टन धान खरेदी झाले. यामध्ये 705.52 लाख मेट्रिक टन खरीप आणि 36.89 लाख मेट्रिक टन रब्बी हंगामातील धानाचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत 687.24 मेट्रिक टन धान खरेदी झाली होती. खरीप विपणन हंगामातील हमीभावाने झालेल्या 1,40,165.72 कोटी रुपये खरेदीचा लाभ 111.00 लाख शेतकऱ्यांना झाला आहे.

 

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांच्या आधारे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, ओदिशा, राज्यस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम-2020 मध्ये 107.37 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी मूल्य समर्थन योजनेनुसार करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटत, व केरळ या राज्यांमध्ये मूल्य समर्थन योजनेनुसार  1.74 लाख मेट्रिक टन खोबरे (बारमाही पीक) खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे.  इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जर डाळी, तेलबिया आणि खोबरे यांच्या 2020-21 या वर्षातील मूल्य समर्थन योजनेनुसार खरेदीचे  प्रस्ताव पाठविले तर त्याच्या एफएक्यू ग्रेडची खरेदी शेतकऱ्यांकडून 2020-21 च्या अधिसूचित मुल्यानुसार नियोजित हंगामात केली जाईल. जर बाजारपेठेतील किमती आधारभूत मुल्यांहून कमी झाल्या तर राज्यांनी  निर्धारित केलेल्या संस्थांच्या माध्यमातून केंद्रीय नोडल संस्थाच्या पिक संस्थांकडून खरेदी होईल.

दिनांक 14.05.2021 पर्यंत सरकारने नोडल संस्थांच्यामार्फत 6,69,411.32 मेट्रिक टन मूग,उडीद,तूर, मसूर या डाळी, भूईमुगाच्या शेंगा, मोहरीबिया आणि सोयाबीन यांची किमान आधारभूत मूल्याने खरेदी केली. खरीप 2020-21 व रब्बी 2021 च्या हंगामातील 3,507.80 कोटी रुपये मुल्याच्या या खरेदीचा लाभ तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, उत्तरप्रदेश, तेलंगणा, हरयाणा, व राजस्थान या राज्यांमधील 4,01,265 शेतकऱ्यांना झाला.

 

याशिवाय 14.05.2021. पर्यंत खोबरा या बारमाही पिकाच्या 5089 मेट्रीक टन 52.40 रु कोटींच्या झालेल्या खरेदीचा लाभ कर्नाटक, तामिळनाडूतील 3961 शेतकऱ्यांना झाला.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1718952) आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi