संरक्षण मंत्रालय

गोवा सागरी परिसंवाद (जीएमएस)- 2021

Posted On: 13 MAY 2021 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मे 2021

आपल्या सागरी शेजाऱ्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने 11 आणि 12 मे 21 रोजी गोव्याच्या नेव्हल वॉर कॉलेजच्या वतीने 'जीएमएस -21' आयोजित केले होते. कोविड -19 महामारीमुळे प्रथमच या कार्यक्रमाचे आभासी आयोजन करण्यात आले होते. भारत, बांग्लादेश, कोमोरोज, इंडोनेशिया, मादागास्कर , मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड या 13 हिंद महासागर क्षेतातील देशांचे नौदल प्रतिनिधी यात ऑनलाइन सहभागी झाले होते. जीएमएस -21 ची संकल्पना "सागरी सुरक्षा आणि उदयोन्मुख अपारंपारिक धोके - आयओआर नेव्हीजसाठी कृतीशील भूमिकेसाठीचे एक उदाहरण " यावर केंद्रित असून ज्यात उदयोन्मुख सामान्य सागरी धोक्यांचा सामना करण्यासाठी आयओआर नौदलांसाठी सक्रिय भूमिका" आणि सामायिक सागरी धोक्यांचा सामना करण्यासाठी क्षमता वाढवण्यावर यात भर देण्यात आला.

एकविसाव्या शतकाच्या धोरणात्मक केंद्रस्थानी हिंद महासागर क्षेत्र असल्यामुळे,सागरी क्षेत्रामधील समान हितांच्या मुद्यांवर धोरण, रणनीती आणि अंमलबजावणी यंत्रणा विकसित करणाऱ्या हितधारकांना एकत्र आणण्यात या परिसंवादाची रचनात्मक भूमिका होती. भागीदार सागरी संस्थांमध्ये आंतर परिचालन क्षमता वाढवण्यासाठी सहकार्यात्मक रणनीती सादर करण्याव्यतिरिक्त, या कार्यक्रमाद्वारे विषय आधारित चर्चेबरोबरच महत्त्वपूर्ण सागरी समस्यांवबाबत मते व्यक्त करण्यासाठी एक मंच उपलब्ध करुन देण्यात आला.
कमोडोर नितीन कपूर, डेप्युटी
कमांडंट नेव्हल वॉर कॉलेज यांनी स्वागतपर भाषणातून उपस्थितांचे स्वागत केले. नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट व्हीएसएम, रियर ऍडमिरल साई वेंकट रमण यांच्या हस्ते परिसंवादाचे औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले. कमोडोर (परराष्ट्र सहकार्य) शांतनु झा यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सर्व सदस्य देशांचे गोवा सागरी परिसंवाद -21 मधील मोलाच्या योगदानाबद्दल आभार मानले.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1718359) Visitor Counter : 257