मंत्रिमंडळ
भारतीय सनदी लेखापाल संस्था आणि कतार आर्थिक केंद्र प्राधिकरण यांच्यामधील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
12 MAY 2021 5:58PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय सनदी लेखापाल संस्था (आयसीएआय) आणि कतार आर्थिक केंद्र प्राधिकरण (क्यूएफसीए) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. या सामंजस्य करारामुळे कतारमध्ये लेखांकन व्यवसाय आणि उद्यमशीलतेला बळकट करण्याच्या उद्देशाने एकत्रित काम करण्यासाठी संस्थांमधील सहकार्य वाढणार आहे.
प्रभाव:
आयसीएआयचे मध्य पूर्वेत 6,000 हुन अधिक सदस्यांसह एक बळकट सदस्यता आहे आणि कतार (दोहा) येथील आयसीएआय शाखा सर्वात सक्रिय शाखांपैकी एक आहे. आयसीएआयचे सदस्य कतारमध्ये विविध खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर आहेत तसेच लेखांकन व्यवसायासाठी पाठिंबा आणि विकासात सक्रियपणे गुंतलेले आहेत. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने संपूर्ण मध्य-पूर्व क्षेत्रातील आयसीएआय सदस्यांना आणखी प्रोत्साहन आणि ओळख मिळेल.
कतारमधील, दोहा येथे आयसीएआयची एक सक्रिय शाखा आहे, या शाखेची स्थापना 1981 मध्ये करण्यात आली होती आणि आयसीएआयच्या परदेशातील 36 शाखांपैकी सर्वात जुनी शाखा आहे. या सामंजस्य करारामुळे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारतीय सनदी लेखापाल संस्था आणि कतार आर्थिक केंद्र प्राधिकरण यांना लाभ मिळणार आहे.
अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्ट :
• हा सामंजस्य करार हमी आणि लेखापरीक्षण, सल्लागार , कर आकारणी, वित्तीय सेवा आणि संबंधित क्षेत्रांमध्ये कतारमध्ये व्यावसायिक सेवा उपलब्ध करून देंण्याच्या उद्देशाने प्रक्रिया निश्चित करून आयसीएआय सदस्यांच्या संधीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आहे.
• आयसीएआय क्यूएफसीए सोबत कतारमध्ये एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक, उद्योजक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना विकसित करेल.
• कतारमधील भारतीय व्यवसायांना मिळणार्या संधींचा शोध घेण्यासाठी आयसीएआय आणि क्यूएफसीए एकत्र काम करतील.
• कंपनी प्रशासन, तंत्रज्ञान संशोधन आणि सल्ला, गुणवत्तेची हमी, न्यायवैद्यक लेखांकन, लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवहारांचे (एसएमपी) मुद्दे, इस्लामिक अर्थव्यवस्था, शाश्वत व्यावसायिक विकास (सीपीडी) आणि परस्पर हिताच्या अन्य विषयांसारख्या क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या संधींसाठी आयसीएआय आणि क्यूएफसीए सहकार्य करतील.
पार्श्वभूमी :
भारतीय सनदी लेखापाल संस्था (आयसीएआय) ही, भारतीय संसदेने मंजूर केलेल्या सनदी लेखापाल कायदा,1949 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक संस्था आहे. कतार आर्थिक केंद्र प्राधिकरण (क्यूएफसीए) 2005 च्या कायदा क्रमांक (7) च्या अनुषंगाने स्थापन केलेली स्वतंत्र कायदेशीर संस्था असून कतारमध्ये जागतिक स्तरावरील वित्तीय आणि व्यावसायिक केंद्राच्या रूपात क्यूएफसीच्या विकासासाठी आणि प्रोत्साहनासाठी उत्तरदायी आहे.
***
S.Tupe/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718033)
Visitor Counter : 248
Read this release in:
Punjabi
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam