PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
12 MAY 2021 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 12 मे 2021
- India’s Active Caseload Declines for the Second Consecutive day
- WHO has not associated the term “Indian Variant” with B.1.617, now classified as Variant of Concern
- Government to ramp up availability of Amphotericin B - to fight Mucormycosis
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असून आता ती 37,04,099 झाली आहे. देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येच्या ती 15.87% इतकी आहे.
गेल्या 24 तासांत कोविड सक्रीय रुग्णसंख्येत 11,122 नी घसरण झाली आहे. सक्रीय रुग्णसंख्येत घसरण होण्याचा आजचा सलग दुसरा दिवस आहे.
देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 82.51% रुग्ण हे देशातील 13 राज्यांमधील आहेत.
भारतात आतापर्यंत कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आजमितीला 1,93,82,642 इतकी आहे तर राष्ट्रीय रोगमुक्ती दर 83.04% इतका आहे.
गेल्या 24 तासांत 3,55,338 रुग्ण कोविडमधून मुक्त झाले.
सलग दुसऱ्या दिवशी रोगमुक्त झालेल्यांची संख्या दैनंदिन पातळीवर नव्याने बाधित झालेल्यांपेक्षा जास्त होती.
71.58% रुग्ण हे देशाच्या दहा राज्यांमधील आहेत.
“संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाच्या माध्यमातून राज्य सरकारांच्या कोविड व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना पाठबळ पुरविण्यासाठी भारत सरकार जागतिक पातळीवरून आलेल्या मदतीचे अत्यंत तातडीने वितरण करीत आहे. भारताला केलेल्या जागतिक मदतीच्या रूपाने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोविड प्रतिसादाला बळकट करून मदत करण्यासाठी आतापर्यंत एकूण 9,200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5,243 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 5,913 व्हेन्टिलेटर्स/बाय पॅप, रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.44 लाख कुप्या प्राप्त झाल्या आहेत. केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जागतिक मदतीचे सुरळीत आणि जलद वितरण सुनिश्चित करण्यासाठी वेगवान सीमा शुल्क विभाग मंजुरी आणि हवाई तसेच रस्ते मार्गांचा वापर करीत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा विस्तार होत असताना देशातील लसीकरण झालेल्यांच्या एकूण संख्येने 17.52 कोटींचा आकडा पार केला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात आज एकूण 25,47,534 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 17,52,35,991 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 95,82,449 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 65,39,376 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,41,49,634 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 79,52,537 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 45 वर्षे वयोगटातील 30,44,463 लाभार्थी (पहिली मात्रा) तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 5,58,83,416 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 78,36,168 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,39,59,7721 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,62,88,176 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
इतर अपडेटस्
उत्पादक / आयातदार यांच्याकडे असलेल्या शिल्लक साठ्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि 11 मे 2021 रोजी औषध विभागातील अॅम्फोटेरिसिन बी या औषधाच्या मागणीचा पाहिल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे औषध वाटप अपेक्षित पुरवठ्यानुसार दिनांक 10 मे ते 31 मे, 2021 पर्यंत उपलब्ध केले जाईल. सरकारी, खाजगी रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांमधून समान प्रमाणात पुरवठ्याचे वितरण करण्यासाठी एक यंत्रणा तयार करण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे. या वाटपातील औषध मिळविण्यासाठी खाजगी आणि शासकीय रुग्णालयांतून संपर्क रुग्णांच्या सोयीसाठी सार्वजनिकपणे जाहीर करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त राज्यांना अशी विनंती करण्यात आली आहे, की यापूर्वी पुरवठा केला गेलेला साठा आणि उपलब्ध असलेला साठा यांचा काटेकोरपणे वापर करावा. राष्ट्रीय औषध मूल्यांकन प्राधिकरण (नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग अथॉरिटी, एनपीपीए) यांच्याद्वारे पुरवठ्याच्या व्यवस्थेचे परीक्षण केले जाईल.
PIB FACT CHECK
***
Jaydevi PS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717975)
Visitor Counter : 114