पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

तेल आणि  वायू क्षेत्रातील सार्वजनिक  कंपन्या  रुग्णालयांमध्ये 100 पीएसए वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारत आहेत

Posted On: 06 MAY 2021 7:23PM by PIB Mumbai

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील  तेल आणि वायू क्षेत्रातील  सार्वजनिक कंपन्या या संकट काळात देशाची द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची गरज पूर्ण  करण्यासाठी  प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली त्या  देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये सुमारे 100 ऍडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारत  आहेत. या उपक्रमांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, गोवा, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश आणि दिल्लीतील रुग्णालये समाविष्ट केली जातील. या प्रकल्पांचा संपूर्ण खर्च कंपन्यांकडून त्यांच्या सीएसआर निधीतून  वहन केला जाईल.

हे पीएसए संयंत्र 200 ते 500 खाटांच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या क्षमतांचे आहेत.  ते डीआरडीओ आणि सीएसआयआरद्वारे प्रदान केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून  ऑक्सिजन मिळवण्यासाठी सभोवतालच्या हवेतून  नायट्रोजन शोषून घेतात. अशा प्रकारे निर्माण होणारा ऑक्सिजन  रुग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांना थेट पुरवला जाईल. या संयंत्रांसाठी भारतीय विक्रेत्यांकडे ऑर्डर देण्यात आल्या आहेत आणि या महिन्यापासूनच ते कार्यान्वित होऊ लागतील आणि जुलैपर्यंत सर्व संयंत्र उपलब्ध होतील.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716587) Visitor Counter : 187