कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
18 वर्षे आणि त्याहून जास्त वयाच्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
04 MAY 2021 7:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2021
केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) जितेंद्र सिंग यांनी 18 वर्षे व त्याहून जास्त वय असणाऱ्या सर्व पात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.

टपाल आणि तार खात्याने 22/04/2021 रोजी या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. 6/4/2021 रोजीच्या OM मध्ये मंत्रीमहोदयांनी 45 आणि त्याहून जास्त वयाच्या सर्व पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेण्यास सांगीतले होते. कार्मिक विभागाद्वारे नॉर्थ ब्लॉक मध्ये लसीकरणासाठी नियमित शिबिर आयोजित केले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि 18 वर्षे व त्याहून जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांनी www.cowin.gov.in वर नोंदणी करून लवकरात लवकर त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यांनीही वारंवार हात धुणे, सॅनिटायझेशन, नाक/तोंड झाकणाऱ्या मुखपट्टीचा वापर, शारीरिक अंतर राखणे इत्यादी कोविड-सुसंगत आचरण सुरू ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

नुकत्याच म्हणजे 03.05.2021 रोजी निघालेल्या OM कडे लक्ष वेधत जितेंद्र सिंग यांनी कोविड संसर्ग रोखण्यासाठी 19.04.2021 रोजी नमूद केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांची यात पुनरावृत्ती असल्याचे सांगितले.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1715990)
आगंतुक पटल : 198