आयुष मंत्रालय

“आयुष-64” औषधाबद्दल वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आयुष मंत्रालयाने दिली उत्तरे


सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचा कोविड-19 संसर्गावरील उपचारासाठीच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये “आयुष-64” हे बहु-वनौषधी औषध उपयुक्त असल्याचे दिसून आले

Posted On: 04 MAY 2021 11:15AM by PIB Mumbai

आयुष-64 हे बहु-वनौषधी औषध मूलतः हिवतापावरील उपचारासाठी 1980 मध्ये विकसित करण्यात आले होते, पण आता या औषधाचा उपयोग कोविड-19 वरील उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याने या महामारीच्या संकटात तज्ञांनी या औषधाला आशेचा किरण म्हटले आहे. आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या आणि आयुर्वेद विषयाला समर्पित असलेल्या सीसीआरएएस अर्थात केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन मंडळाने सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसेच इतर संशोधन संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या संयुक्त सहकार्याने केलेल्या या औषधाच्या सखोल आणि कठोर वैद्यकीय चाचण्यांचा निष्कर्ष नुकताच जाहीर केला.

 मान्यताप्राप्त संशोधकांनी केलेल्या या चाचण्यांतून असे दिसून आले की, आयुष 64 या औषधात उल्लेखनीय प्रमाणात विषाणूप्रतिकारक, प्रतिकारशक्ती सुधारक आणि ताप नियंत्रणात ठेवणारे गुणधर्म आहेत. हे औषध सौम्य तसेच मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 संसर्गावरील उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले. म्हणून कोविड-19 आजारावरील उपचारांमध्ये या औषधाचा समावेश करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालयाने 29 एप्रिल 2021 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयुष -64 या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केल्यानंतर सामान्य जनता आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये देखील या औषधाविषयी मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. या विषयासंदर्भात विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून आयुष मंत्रालयाने आता एफएक्यूज अर्थात वारंवार विचारले जाणारे प्रश्न या विशिष्ट सदराखाली अशा प्रश्नांची उत्तरे प्रसिध्द केली आहेत, ती खालीलप्रमाणे आहेत:

 

आयुष-64 म्हणजे नेमके काय आहे?

आयुष-64 हे आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या आणि आयुर्वेदात संशोधन करणारी शिखर संस्था, सीसीआरएएस अर्थात केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन मंडळाने विकसित केलेले काही आयुर्वेदिक औषधांचे विशिष्ट प्रमाणातील संयुग आहे. मूलतः हिवतापावरील उपचारासाठी 1980 मध्ये विकसित करण्यात आलेल्या या औषधात उल्लेखनीय प्रमाणात विषाणूप्रतिकारक, प्रतिकारशक्ती सुधारक आणि ताप नियंत्रणात ठेवणारे गुणधर्म आढळल्यामुळे त्याचा समावेश  कोविड-19 आजारावरील उपचारपद्धतीमध्ये करण्यात आला आहे. आयुष-64 या औषधाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्या असे दाखवितात की त्याच्या 36 पैकी 35 घटकांमध्ये कोविड-19 विषाणूला बंदिस्त करू शकणारे तीव्र आसक्तीकारक गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक औषधांचे हे विशिष्ट प्रमाणातील हे आयुर्वेदिक  संयुग फ्ल्यूसारख्या आजारांमध्ये देखील अत्यंत विश्वसनीय परिणाम साधते. भारतभर  झालेल्या 6 वैद्यकीय अभ्यासातून मिळालेल्या शास्त्रीय पुराव्यांतून असे सिद्ध झाले आहे की लक्षणविरहित,सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 आजाराच्या व्यवस्थापनात रुग्णाचे वैद्यकीय स्वास्थ्य आणि जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने आयुष-64 या औषधात प्रमाणित उपचारांमध्ये अनुषंगिक मदत करण्याची क्षमता आहे. 

 

आयुष-64 ह्या औषधाचे सेवन कोण करू शकते?

कोविड-19 आजाराच्या कोणत्याही टप्प्यावरील रुग्ण हे औषध घेऊ शकतो. मात्र, लक्षणविरहित, सौम्य आणि मध्यम आणि प्रकृतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचे धोकादायक घटक अंतर्भूत नसलेल्या रुग्णांमध्ये कमी प्रमाणात निष्कर्ष मिळविण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या या औषधाची परिणामकारकता तपासली आहे आणि म्हणून ज्या रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची किंवा रुग्णालयात उपचार घेण्याची आवश्यकता नाही असेच रुग्ण हे औषध घेण्यासाठी पात्र आहेत. या औषधाचा उत्तम उपयोग होण्यासाठी, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेले आणि ताप, कणकण, अंगदुखी, नाक चोंदणे, नाकातून स्त्राव वाहणे, डोकेदुखी, खोकला, इत्यादी लक्षणे असणारे कोविड-19 आजाराचे रुग्ण तसेच आजाराची कोणतीही लक्षणे नसणारे कोविड-19 बाधित यांची RT-PCR चाचणीद्वारे आजाराची निश्चिती झाल्यानंतर हे रुग्ण 7 दिवसांच्या आत हे औषध सुरु करू शकतात.  

 

मी आयुष-64 हे औषध का घ्यावे?

आयुष -64 हे औषध आजाराची लक्षणे आणि तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने रोगातून बरे होण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढविते असे दिसून आले आहे. सामान्य आरोग्य, थकवा, अस्वस्थता, ताण,भूक लागणे, सामान्य स्वास्थ्य आणि झोपेच्या बाबतीत देखील या औषधाचे अत्यंत लाभदायी परिणाम होतात.

 

या औषधाची कोविड-19 आजारावरील परिणामकारकता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाली आहे का?

आयुष-64 या औषधात बहु-वनौषधींचे विशिष्ट प्रमाणातील संयोजन केलेले असून ते आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या आणि आयुर्वेद विषयाला समर्पित असलेल्या सीसीआरएएस या शिखर संस्थेने आखून दिलेल्या सर्व नियामकीय पात्रता तसेच दर्जा आणि औषधीकोषातील प्रमाणकांची पूर्तता करून विकसित केले आहे. लक्षणविरहित, सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड-19 आजाराच्या रुग्णांमध्ये प्रमाणित उपचारपद्धतीला अनुषंगिक मदत म्हणून हे औषध उपयुक्त असल्याचे देशभरात करण्यात आलेल्या कठोर वैद्यकीय चाचण्यांतून शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष असे सांगतात की, कोविड-19 संसर्गावरील उपचारपद्धतीतील  प्रमाणित उपचारांना अनुषंगिक मदत म्हणून आयुष-64 चा वापर केल्यास रुग्णामध्ये उत्तम प्रमाणात सुधारणा दिसून आली आणि अशा रुग्णाला केवळ प्रमाणित उपचारपद्धती देताना आवश्यक असलेल्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात ठेवावे लागले.

 

कोविड-19 रुग्णांसाठी आयुष-64 औषधाची योग्य मात्रा काय आहे?

लक्षणविरहित कोविड-19 रूग्णांनी आयुष-64 औषध- (500 मिलीग्राम) च्या 2 गोळ्या दिवसांतून दोनदा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत 14 दिवस घ्यायच्या आहेत. तर सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रूग्णांनी 500 मिलीग्राम आयुष-64 च्या दोन गोळ्या दिवसांतून तीनदा जेवण/आहारानंतर कोमट पाण्यासोबत 14 दिवस घ्यायच्या आहेत.

 

आयुष-64 चे काही दुष्परिणाम होतात का

 काही रूग्णांना हगवणीचा त्रास होऊ शकतोमात्र हा त्रास मर्यादित स्वरूपाचा असून त्यासाठी कुठल्याही वैद्यकीय उपचारांची गरज नाही.

  

आयुष-64 हे औषध रोगप्रतिकारक औषध म्हणून घेतले जाऊ शकेल का?

हे औषध रोगप्रतिकारक म्हणूनही घेतले जाऊ शकेल. त्यासाठी 500 मिलीग्रामच्या 2 गोळ्या दिवसातून दोनदा घेता येतील. मात्ररोगप्रतिबंधात्मक औषध म्हणून आयुष-64 ची कार्यक्षमता किती आहेयाच्या चाचण्या अद्याप झालेल्या नाहीत. मात्रजर एखादी व्यक्ती कोविड रुग्णाच्या संपर्कात आली तरलक्षणे दिसू लागल्यावर आयुष-64 सुरु करायला हरकत नाही.मात्र त्याआधी रुग्णाने आपली आर टी पी सीआर किंवा रैपिड अँटीजेन चाचणी करून मगच उपचार सुरु करावेत आणि कोविड नियमांचे पालन करावे असे सांगण्यात आले.

 

सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी आयुष-64 हे एकमेव औषध आहे का?

असे समजायला हरकत नाही. सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळल्यास आयुर्वेदिक डॉक्टरच्या मार्गदर्शनाखालीया रुग्णांवर पूर्ण उपचार करण्यात येतीलमात्र त्यासाठी कायम सल्ला आणि सूचना देण्यासाठी डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे.

मात्रआयुष 64 च्या मात्रागृह-अलगीकरणात कोविड रूग्णांनी आपल्या सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसल्यावर त्या अनुरूपच औषधांच्या मात्रा घेणे योग्य ठरेल. आयुष-64 चा वापर केवळ अधिकृत आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे योग्य ठरेल 

  

आयुष-64 औषध किती दिवस घ्यावे लागेल? 

आयुष-64 च्या गोळ्या कमीतकमी 14 दिवस तरी घ्यायला हव्यात . मात्र,शकते जर गरज पडली तर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारहे औषध 12 आठवडे घेतले जाऊ शकते. हे औषध 12 आठवडे घेणे सुक्षित असल्याचेशास्त्रीयदृष्ट्या  सिध्द झाले आहे.

  

आयुष 64चा वापर कसा करवा ?

त्याचे सेवन कोमट  पाण्यासोबत केले जावे. जेवणानंतर एक तासाने हे औषध घेणे अधिक योग्य ठरेल.

 

ज्या रुग्णाला कोविड रुग्णाला इतर सहव्याधीही आहेतत्यांना आयुष 64 हे औषध घेता येईल का?

ज्या रूग्णांना उच्च रक्तचापमधुमेह आहे,  अशा रूग्णांनी जर त्यांना लक्षणविरहितत्यासोबच सौम्य किंवा मध्यम स्वरुपाचा  कोविड असेल तर त्यांनीही आयुष-64 घ्यावे. तसेच आपली आधीची औषधे देखील सुरूच ठेवावीत.

 

लसीकरणानंतर आयुष-64 औषध घेणे योग्य आहे का?

होय. जर व्यक्तीला लसीकरणानंतर संसर्ग झाला तर त्याने आरटी पीसीआर चाचणी करुन कोविड झाल्यानंतरच्या सात दिवसांत हे औषध सुरु करू शकतो .मात्र त्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला जावा. मात्रयाबाबतच्या लाभांचे शास्त्रीय पुरवावे अद्याप उपलब्ध झालेले  नाहीत.

 

आयुष-64 गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी सुरक्षित आहे का?

 गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी औषध-64 सुरक्षित असल्याबाबतचे कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत.

 

आयुष-64 हे औषध बाजारात उपलब्ध आहे का?

होय. हे औषध बाजारात उपलब्ध आहेआणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात ते उपलब्धही आहे. मात्र आयुर्वेदिक डॉक्टरांच्या चिट्ठीविना त्याची थेट दुकानातून खरेदी करूनवापर व्हायला नको. तसेचडॉक्टरांच्या देखरेखीशिवाय ते घेणेही अयोग्य ठरेल.

 

आयुष-64 चे सेवन करतांना मी कोणत्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे?

आयुष-64 चा वापर करतांना काही विशिष्ट काळजी घेण्याच्या सूचना नाही. मात्रआयुष तसेच आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी कोविड बाबत दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले जावे.

***

JPS/Sanjana C/RA/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715884) Visitor Counter : 3104