अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय

अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘अन्नप्रक्रिया उद्योगाशी संबंधित उत्पादन संलग्न सवलत योजने’बाबत जारी केल्या मार्गदर्शक सूचना


नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या योजनेसाठी समर्पित पोर्टलचेही उद्घाटन

Posted On: 03 MAY 2021 8:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात उत्पादन संलग्न सवलत योजना राबवण्याबाबतच्या  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, तसेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एका समर्पित पोर्टलचे (PLISFPI) उद्घाटनही आज करण्यात आले.

या योजनेविषयीच्या मार्गदर्शक सूचना मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.mofpi.nic.in   वरही उपलब्ध आहेत. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते आज ला ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन झाले. या ऑनलाईन पोर्टलची लिंक - https://plimofpi.ifciltd.com ही आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या घोषणेचा भाग म्हणून केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया उद्योगक्षेत्रासाठीही उत्पादन-संलग्न सवलत योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. वर्ष 2021-22  ते 2026-27 या पाच वर्षात ही योजना राबवली जाणार असून त्यासाठी 10,900 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत जागतिक स्तरावरील खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांचा भारतातील नैसर्गिक संसाधन संस्थांशी समन्वय घडवून त्याआधारे, भारतीय ब्रांडच्या खाद्यपदार्थांना या पुरवठा साखळीशी जोडत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या योजनेसाठी पहिल्या श्रेणीत आवेदकांची निवड त्यांची विक्री, निर्यात आणि गुंतवणुकीच्या आधारावर केली जाईल. या योजनेअंतर्गत सवलत किंवा प्रोत्साहन देण्यासाठी चार प्रकारच्या उत्पादनांचा विचार करण्याचा प्रस्ताव आहे.

त्यात रेडी टू कुक/रेडी टू इट ज्यात बाजरी आधारित खाद्यपदार्थ, प्रक्रियाकृत फळे आणि भाजीपाला, सागरी खाद्यपदार्थ, आणि मोझेरीला चीझचा समावेश आहे.  कव्हरेजसाठी समविष्ट करण्यात आलेली खाद्य उत्पादने आणी आणि विविध विभागातून वगळण्यात आलेल्या उत्पादनांचाही या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. निवड झालेल्या आवेद्क कंपन्यांनी यासाठी आवश्यक अशी किमान विक्री वाढची अट पूर्ण केल्यासच ते या सवलतींसाठी पात्र ठरतील.

दुसऱ्या श्रेणीत लघु उद्योग क्षेत्रांची  निवड करतांना, तसेच कल्पकतेने तयार करण्यात आलेले/सेंद्रिय खाद्यपदार्थ यांची निवड, त्यांनी दिलेले प्रस्ताव, त्यांच्या उत्पादनातील वेगळेपण आणि उत्पादन विकासाची पातळी या आधारावर केली जाईल. तिसऱ्या श्रेणीत आवेदाकाची निवड करतांना, परदेशातील ब्रांडीग आणि मार्केटिंग, संबंधित कंपनीच्या ब्रांड ला परदेशात मिळालेली मान्यता, उत्पादनाचे धोरण आणि नियोजन, विक्री, निर्यात आणि देशांतर्गत बाजारात तसेच निर्यात मार्केटमध्ये उत्पादनाचे  ब्रांडिंग यावर आधारित असेल.

योजनेविषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि EOI मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यासंबंधीचे प्रस्ताव, EoI केवळ ऑनलाईन : https://plimofpi.ifciltd.com  या पोर्टलवरुन पाठवता येतील. आवेदन पाठवण्याची अंतिम तारीख 17.06.2021 असून त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही आवेदने स्वीकारली जातील.

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1715756) Visitor Counter : 246


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi