गृह मंत्रालय

दिल्लीत कोविड-19 च्या सज्जतेबाबत कॅबिनेट सचिवांनी घेतला आढावा

Posted On: 02 MAY 2021 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2021 

 

भारत सरकारचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी आज दिल्लीतील कोविड -19 च्या सज्जतेमधील विविध बाबींचा आढावा घेतला.

कोविड खाटा, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर दिल्लीत वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याच्या गरजेवर कॅबिनेट सचिवांनी जोर दिला. सर्व समर्पित संकेतस्थळे / ऍप्सद्वारे लोकांना कोविड खाटा व इतर सुविधा / औषधाची उपलब्धता याबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला ज्यायोगे अशा प्रकारच्या सुविधा / औषधांची गरज असलेले लोक योग्य ठिकाणी पोहोचू शकतील. गरजू लोकांना संबंधित क्लिनिकल माहिती देण्यासाठी, एकल हेल्पलाइन अग्रक्रमाने तयार केली जावी आणि ती लोकप्रिय करावी; हेल्पलाइन एका समर्पित आणि कर्मचार्‍यांच्या कॉल सेंटरद्वारे चालवली जाऊ शकते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी कोविड रूग्णांसाठी उपलब्ध खाटांची संख्या, प्रत्येक ठिकाणच्या रुग्णालयात पारदर्शक इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेद्वारे दाखवण्याची पूर्वीची पद्धत पुन्हा सुरू करण्याची गरज व्यक्त केली. विविध रुग्णालये व वैद्यकीय सुविधांमध्ये ऑक्सिजन ऑडिट समित्यांची स्थापना करण्यावर आरोग्य विभागाच्या अपर सचिवांनी भर दिला. 

डॉक्टर व्ही के पॉल यांनी सध्याच्या परिस्थितीच्या गांभीर्यावर जोर दिला आणि राजधानी मधील वैद्यकीय पायाभूत सुविधा मिळण्यासाठी छोटी नर्सिंग होम आणि रुग्णालये यांच्यात समन्वय साधण्याची शिफारस केली. हॉटेल्स आणि तत्सम ठिकाणी नियमानुसार कोविड केअर सेंटर सुरू करावी असे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारच्या अहोरात्र सुरु असणाऱ्या हेल्पलाइनला पूरक म्हणून कोविड -19 रुग्णांना मोफत वैद्यकीय मार्गदर्शन करण्यासाठी दिल्ली मेडिकल असोसिएशनला 50 डॉक्टर्स पुरविण्याची विनंती करण्याची शिफारस त्यांनी केली. औषधे, ऑक्सिजन काँसंट्रेटर्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा याबाबत हेल्पलाईन/ वैद्यकीय व्यावसायिक मार्गदर्शन करू शकतात.

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715581) Visitor Counter : 200