अर्थ मंत्रालय

महामारीचे गांभीर्य लक्षात घेता काही अनुपालन तारखांना केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे

Posted On: 01 MAY 2021 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2021

 

कोविड-19 महामारीमुळे उद्‌भवलेली बिकट परिस्थिती आणि करदाते, कर सल्लागार तसेच संबंधित देशभरातील अनेक घटकांनी केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर, काही अनुपालन तारखा शिथील करत, सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आहे. तसेच भागधारकांच्या अडचणी दूर करण्यासाठी केन्द्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तीकर कायदा 1961 च्या कलम 119 अंतर्गत करदात्यांना पुढीलप्रमाणे सवलत दिली आहे :

अ) अधिनियमातील भाग XX अंतर्गत आयुक्त (अपील) यांना अपील करणे, त्यासाठी त्या कलमांतर्गत विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2021 किंवा त्या नंतर आहे. त्या कलमांतर्गत प्रदान केलेल्या कालावधीत किंवा 31 मे 2021 पर्यंत जे अधिक कालावधीचे असेल तसे विवरणपत्रे दाखल केली जाऊ शकतात.

ब) कायद्याच्या कलम 144 सी अन्वये तंटा निवारण समितीकडे (डीआरपी) आक्षेप नोंदवण्यासाठी, त्या कलमांतर्गत अंतिम तारीख 1 एप्रिल, 2021 किंवा त्या नंतर आहे.  त्या कलमांतर्गत कालावधी किंवा 31 मे, 2021 यापैकी अधिक कालावधीपर्यंत आक्षेप नोंदवता येतील.

क) अधिनियम कलम 148 अन्वये नोटिस आल्यानंतर प्राप्तिकराचा परतावाभरण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2021 आहे.  त्यानंतर त्या नोटीस अंतर्गत दिलेला कालावधी किंवा 31 मे 2021 पैकी अधिक कालावधीपर्यंत असेल ते; या दरम्यान  परतावा भरता येईल.

ड) आर्थिक वर्ष 2020-2021  उप कलम (4) नुसार विलंबाने परतावा भरणे आणि कायद्याच्या 139 कलमानुसार

उप कलम (5) अंतर्गत नव्याने परतावा भरणे यासाठी 31 मार्च 2021 ही शेवटची तारीख आहे. आता 31 मे 2021 पूर्वी हा भरणा करता येईल.

इ) कलम १ 194 I-आयए, कलम १ 194--आयबी आणि कलम १ M under च्या खाली वजावट कर भरणे आणि अशा कर वजावटीसाठी चलन-सह-स्टेटमेंट दाखल करणे, जे 30 एप्रिल, २०२१ पर्यंत अनुक्रमे भरणे आणि सादर करणे आवश्यक आहे. आयकर नियम १ R 62२ च्या नियम अंतर्गत 31 मे 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरली आणि सुसज्ज केली जाऊ शकते;

कायद्याच्या कलम  194-IA, कलम 194-IB आणि कलम  194M अंतर्गत वजावट कर भरणे आणि त्या कर वजावटीबाबत चलान-अर्ज दाखल करणे, पैसे भरणा करणे सगळ्या अटींची पूर्तता करणे हे 30 एप्रिल 2021 पर्यंत व्हायला हवे. प्राप्तीकर नियम 30, 1962 नुसार ही प्रक्रिया़ व्हायला हवी. आता 31 मे 2021 रोजी किंवा त्याआधी ही प्रक्रीया पूर्ण करता येईल.

फ) अर्ज क्रमांक 61मधे देण्याची माहिती, अर्ज क्रमांक 61 मधे जाहीर करण्याची माहिती ही प्रक्रीया  30 एप्रिल, 2021, पर्यंत पूर्ण करायची असते. आता ती 31मे , 2021पूर्वी पूर्ण करता येऊ शकते.

CBDT परिपत्रक No.8/2021 in F. No. 225/49/2021/ITA-II 30.04.2021रोजी प्रसिद्ध. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in.वर उपलब्ध आहे.

वरिल सवलती या, सध्याच्या कठीण काळात करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने उचललेले महत्वाचे पाऊल आहे.     

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715344) Visitor Counter : 335