रेल्वे मंत्रालय

बिगररेल्वे रुग्णांच्या कोविड संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या काळातील कोविड चाचण्या आणि आहाराचे शुल्क रेल्वेकडून माफ

Posted On: 30 APR 2021 8:03PM by PIB Mumbai

 

बिगररेल्वे रुग्णांच्या कोविड संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या काळातील कोविड चाचण्या आणि त्यांना दिलेल्या आहाराचे शुल्क रेल्वेने माफ केले आहे.

भारत सरकार कोविड-19 प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी 'पूर्णत्वाने सरकार' या दृष्टिकोनातून कार्यरत असून यामध्ये सर्व मंत्रालये/ विभाग हे पूर्ण एक असल्याप्रमाणे कार्यरत राहून या साथीचा प्रतिकार करत आहेत, याची विशेष नोंद  घेण्यात यावी.

रेल्वे मंडळाने पुढील निर्णय घेतले आहेत -

I.  शिबिरे किंवा विलगीकरण सुविधांमधील बिगर-रेल्वे व्यक्तींच्या आरटीपीसीआर / रॅपिड अँटीजेन चाचण्यांवरील खर्च लागू न करणे.

II. कोविड संबंधित हॉस्पिटलायझेशन काळात पुरविलेल्या आहारावरील शुल्क लागू न करणे.

कोरोना साथीचा सामना करण्यासाठी भारतीय रेल्वे पूर्ण ताकदीनिशी आघाडीवर राहून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पुरवठा साखळ्या अविरत चालू ठेवून, 'अर्थव्यवस्थेची गती खुंटणार नाही' याची काळजी घेण्यापासून ते कोविड काळजी घेणारे सुसज्ज रेल्वे डबे उपलब्ध करून देण्यापर्यंत आणि ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यापर्यंत तसेच कसोटीच्या प्रसंगीही प्रवासी वाहतूक अबाधित राखण्यापर्यंत अनेक प्रकारे रेल्वेने आपले योगदान दिले आहे.

आता वैद्यकीय बाबीतील हे महत्त्वपूर्ण शुल्क माफ करून, आरोग्यसुविधा सर्वांच्या खिशाला परवडतील अशा करण्याच्या दिशेने रेल्वेने पाऊल टाकले आहे.

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715172) Visitor Counter : 174