आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाच्या योगसंस्थेच्या ऑनलाइन योग प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद
Posted On:
28 APR 2021 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021
कोविड महामारीविरूध्दच्या लढाईचा सामना करण्यासाठी जरी संपूर्ण देश एकजूट असला तरी सध्या वाढत असलेली रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. या संदर्भात आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योगसंस्थेने आयोजित केलेले आरोग्यविषयक आणि तणावमुक्त करणारे दर्जेदार ऑनलाइन योग प्रशिक्षण कार्यक्रम सर्वसामान्यांना बदलत्या परीस्थितीत त्यांचे दैनंदिन जीवन संतुलित करण्यासाठी उपयुक्त सहकार्य प्रदान करत आहेत. बदललेल्या परिस्थितीत हालचालींवर मर्यादा आलेल्या असताना अनेकांना, विशेष करून ज्यांना महामारीच्या कारणाने घरातच बसण्याची वेळ आली आहे त्यांना शारीरिक आरोग्यासह भावनिक स्वास्थ्य मिळवून देत योगाने सकारात्मक मार्ग मिळवून दिला आहे.
प्राथमिक प्रशिक्षणाचे नाव “योग स्वयंसेवक प्रशिक्षण अभ्यासक्रम (YVT)” असे असून यात योग शिक्षण देण्यासोबतच प्रशिक्षणार्थींना योग स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी देत मान्यता प्राप्त करून देते. हे प्रशिक्षण एकूण 36 तासांचे असून त्याचे चार स्तर आहेत.
या महामारीत देशातील लोकांच्या एकत्र येण्यास मज्जाव आहे आणि म्हणूनच एमडीएनआय वायने योग प्रशिक्षणासाठी द्रुकश्राव्य माध्यमाचा आणि डिजिटल पध्दतींचा अवलंब केला आहे. यामुळे या संस्थेला मागील दोन महिन्यांत हजारो लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.
आता आंतरराष्ट्रीय योग दिन-2021 (IDY-2021) दोन महिन्यांवरच येऊन ठेपला असल्याने योगाच्या संदेशाचा संपूर्ण जगभरात प्रसार करण्यासाठी ही सुयोग्य वेळ आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आयुष मंत्रालयाच्या (https://yoga.ayush.gov.in) या योगा पोर्टलवर आणि इतर सामाजिक माध्यमांवर उपलब्ध आहे.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714601)
Visitor Counter : 261