संरक्षण मंत्रालय

कोविडबाधित झालेल्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी भारतीय लष्कर वचनबद्ध

प्रविष्टि तिथि: 27 APR 2021 9:27PM by PIB Mumbai

 

वाढता कोविड प्रादुर्भाव लक्षात घेऊन, पूर्वी सैन्यदलात सेवा बजावलेले माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठीच्या वैद्यकीय सेवांमध्ये वाढ करण्यासाठी भारतीय लष्कर विविध पावले उचलत आहे. या कसोटीच्या क्षणी आपल्या माजी सैनिकांना कोविड-देखभाल पुरविण्यासाठी आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय लष्कर वचनबद्ध आहे. तसेच, कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ते जवळच्या लष्कर सुविधा केंद्रात जाऊ शकतात, अशी ग्वाही लष्कर पुन्हा एकदा देत आहे.

भारतीय लष्कर माजी सैनिक महासंचालनालय, सातत्याने ईसीएचएस तसेच विभाग आणि उपविभागांच्या मुख्यालयांशी समन्वय साधून माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांना मदत व सहकार्य पुरविण्याची व्यवस्था करीत आहे. कोविडग्रस्त माजी सैनिकांना वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन आणि विविध रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी मदत करण्यात येत आहे. दिल्लीतील मुख्य बेस हॉस्पिटल आणि सर्व लष्करी स्थानांवरील सर्व्हिस हॉस्पिटल्स जास्तीत जास्त माजी सैनिकांना सामावून घेण्यासाठी अथकपणे काम करीत आहेत. खाटांची संख्या आणि रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

कोविडबाधित माजी सैनिकांच्या गरज भागविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाच, घरी राहण्याची, सुरक्षा उपाय अवलंबिण्याची आणि कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याची विनंती सर्वांनाच करण्यात येत आहे. विविध लष्करी केंद्रांमध्ये, कोविड परिस्थितीसंदर्भात ईएसएम विभागांशी संपर्कात राहण्याच्या सूचना कर्नल पदाच्या माजी सैनिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्रत्येक ठिकाणी चोवीस तास चालणारे आपत्कालीन क्रमांक सुरु करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराच्या सर्व कोविड हेल्पलाइनचे संपर्क क्रमांक पुढील संकेतस्थळावर मिळू शकतात- www.indianarmyveterans.gov.in  

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1714452) आगंतुक पटल : 279
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil