संरक्षण मंत्रालय
‘वरुण– 2021’ युद्ध कवायती
Posted On:
24 APR 2021 9:24PM by PIB Mumbai
भारतीय आणि फ्रेंच नौदलाच्या द्वैवार्षिक 19 व्या संयुक्त युद्ध कवायती ‘वरुण-2021’ चे अरबी समुद्रात 25 ते 27 एप्रिल 2021 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाकडून आयएनएस कोलकाता, आयएनएस तरकश, आयएनएस तलवार, आयएनएस दीपक, सी-किंग 42बी आणि चेतक हेलिकॉप्टर्स, कलवरी पाणबोट आणि पी8I लांब पल्ल्याचे सागरी गस्त विमान या युद्ध अभ्यासात सहभागी होणार आहे.
भारतीय चमुचे नेतृत्व पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर रिअर अॅडमिरल अजय कोच्चर, नौसेना पदक हे करतील तर फ्रेंच चमुचे नेतृत्व रिअर अॅडमिरल मार्क ऑसेडाट करतील.
तीन दिवस चालणाऱ्या युद्ध सरावात समुद्रात उच्च पातळीवरील नौदल मोहीम, यात अत्याधुनिक हवाई आणि पाणबुडी सरावाचा समावेश आहे. दोन्ही नौदल सागरी क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रदान करण्यासाठी आपले युद्ध-कौशल्य आणखी वर्धित करण्याचा प्रयत्न करतील.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713857)
Visitor Counter : 299