वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कोविड महामारी दरम्यान आंतरिक व्यापार, उत्पादन, वितरण आणि जीवनावश्यक वस्तूंच्या लॉजिस्टिकच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी डीपीआयआयटी मध्ये नियंत्रण कक्ष
Posted On:
23 APR 2021 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2021
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) कोविड-19 च्या नव्याने आलेल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी घातलेल्या सध्याच्या निर्बंधांमुळे वस्तूंची वाहतूक व वितरण, उत्पादन, सामान्य माणसांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण आणि संबंधितांना होणार्या अडचणींवर लक्ष ठेवण्याचे ठरविले आहे. कोविड महामारी दरम्यान आंतरिक व्यापार, उत्पादन, वितरण आणि जीवनावश्यक वस्तूंच्या लॉजिस्टिकच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी डीपीआयआयटी नियंत्रण कक्ष स्थापन करत आहे. कोणतेही उत्पादन, वाहतूक, वितरण, घाऊक किंवा ई-कॉमर्स कंपन्यांना वस्तूंच्या वाहतुकीत आणि वितरणामध्ये किंवा संसाधनांची जमवाजमव करण्यासाठी अडचणी येत असल्यास खालील दूरध्वनी क्रमांक / ईमेल वर माहिती दिली जाऊ शकते:
दूरध्वनी क्रमांक: (011) 23062383, 23062975
ई-मेल: dpiit-controlroom[at]gov[dot]in
वरील दूरध्वनी क्रमांक 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत कार्यरत राहतील. या नियंत्रण कक्षाद्वारे विविध भागधारकांनी नोंदविलेले मुद्दे संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारकडे उपस्थित केले जातील.
* * *
S.Patil/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713632)
Visitor Counter : 228