PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
23 APR 2021 6:55PM by PIB Mumbai



#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona

नवी दिल्ली/मुंबई 23 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19च्या परिस्थिती संदर्भात, ज्या राज्यांमध्ये सध्या सर्वाधिक कोविड बाधित आहेत ती 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली.
विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण अनेक राज्यांमध्ये त्याचप्रमाणे श्रेणी -2 आणि श्रेणी -3 शहरांमध्येही दिसून येत आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी या महामारीशी एकत्रित शक्तीनिशी लढण्याचे आवाहन केले. महामारीच्या पहिल्या लाटेवर भारताने मात केली, याच्या मुळाशी मुख्यत्वे आपले एकत्रित प्रयत्न आणि सहयोगी धोरण होते असे सांगून ते म्हणाले की सध्याच्या आव्हानांना त्याच पद्धतीने तोंड देणे आवश्यक आहे.
या लढाईत राज्यांना केंद्राचे संपूर्ण पाठबळ आहे ही खात्री पंतप्रधान मोदींनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे राज्यांना वेळोवेळी आवश्यक ते सल्ले या मंत्रालयाकडून दिले जात आहेत असे त्यांनी नमूद केले.
पालघर जिल्ह्यातील विरार इथल्या कोविड -19 रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रात विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून प्रत्येकी रु.2 लाख रुपयांची तर गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशात कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 13.54 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासात 3,32,73 नवीन रुग्णांची नोंद झाली.
नवीन रुग्णांपैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये 75.01% रुग्ण आढळले.
महाराष्ट्रात सर्वाधिक 67,013 इतक्या दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 34,254 तर केरळमध्ये 26,995 नवीन रुग्ण आढळले.
इतर अपडेट्स
देशातील कोविड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांना सामना कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील 2 महिने अर्थात मे आणि जून 2021 या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 (एनएफएसए) अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थींना दरमहा माणसी 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने (पीएम -जीकेवाय)” च्या धर्तीवरच हे वाटप केले जाणार आहे.
"ब्रेक द चेन" उपक्रमाचा भाग म्हणून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबईने दि. 23.04.2021 पासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्रे (पीएसकेएस) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (पीओपीकेएस) चे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र सरकार ने कोरोना संक्रमण रोखण्या च्या संदर्भात जारी केलेला आदेश क्रमांक DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक 21.04.2021 च्या नुसार आहे. या आदेशानुसार तारीख 22.04.2021 च्या रात्री 8 पासून ते 01.05.2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात सामान्य कामांवर बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
मुंबईजवळ विरार येथील कोविड रुग्णालयात आग लागून 13 रुग्ण मृत्युमुखी पडले. राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत तर गंभीर रुग्णांना 1 लाख रुपयांची जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि महाराष्ट्रात नव्या रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण स्थिर आहे किंवा थोडेसे कमी झाले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या काही आठवड्यात हे प्रमाण आणखी कमी होईल. दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत 10 हजार कोविड-19 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांत मुंबईत 7 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांचे प्रमाण अधिक आहे.
FACT CHECK



* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1713610)
आगंतुक पटल : 256