PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
22 APR 2021 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 22 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील सध्या होत असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी तसेच ऑक्सीजनची उपलब्धता वाढविण्याचे मार्ग आणि उपाय यांच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज एक उच्च स्तरीय बैठक घेण्यात आली. गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑक्सीजनचा पुरवठा सुधारण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे, ऑक्सिजनच्या वितरणाचा वेग वाढविणे आणि आरोग्य सुविधा केंद्रांना ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करणे अशा विविध पैलूंबाबत वेगाने काम करण्याची गरज पंतप्रधानानी या बैठकीत व्यक्त केली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) आपल्या सर्व कोविड लस उत्पादनाविषयी केंद्र सरकारकडे 25 मे 2021 पर्यंत करार केलेला नाही.
राज्य सरकारांना कोविड-19 लसीच्या अधिक उदार मूल्य आणि वेगवान मोहिमेअंतर्गत लस उत्पादकांकडून लसीच्या मात्रा खरेदी करण्याचे स्वातंत्र्य
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा भाग असलेल्या भारताच्या लसीकरण कार्यक्रमात आतापर्यंत देशातील 13 कोटी 23 लाखांहून जास्त व्यक्तींनी लस घेतली आहे.
गेल्या 24 तासांत, 3,14,835 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली.
नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 75.66% रुग्ण देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली,कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश,बिहार, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमधील आहेत
महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 67,468 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात एका दिवसात 33,106 आणि दिल्लीमध्ये 33,106 नवे रुग्ण सापडले.
महाराष्ट्र अपडेट्स
राज्यातील तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 47 तुरुंगातील 246 कैद्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. राज्यात रात्री 8 वाजेपासून कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी कडक उपायायोजना लागू करण्यात येत आहेत. बुधवारी 67 हजार रुग्ण आणि 568 मृत्यूंची नोंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात एका आठवड्यात 67 हजारावर कोरोना रुग्णांची नोंद होण्याची दुसरी वेळ आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्य सरकार कडक टाळेबंदीच्या दिशेने प्रयत्न करत आहे. अत्यावश्यक नसलेल्या आंतर-जिल्हा वाहतूकीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नसल्याचे ते म्हणाले.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713460)
Visitor Counter : 227