रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसाठीच्या प्रोत्साहनपर योजनेवरील कार्यशाळेला संबोधित केले

Posted On: 20 APR 2021 7:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 एप्रिल 2021

 

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसाठी प्रोत्साहनपर योजनेंतर्गत निवडक अर्जदारांच्या कार्यशाळेला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

कार्यशाळेला संबोधित करताना गौडा म्हणाले की  5  ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी औषध निर्मिती आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्र  निर्णायक भूमिका पार पडतील.  ते म्हणाले की कोविड -19 प्रादुर्भावाने  जगाचे लक्ष भारताकडे वेधले आणि आवश्यकतेनुसार सेवा देण्यास तयार असलेली औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा जागतिक पुरवठादार म्हणून त्यांच्या क्षमतेला मान्यता मिळाली.  वैद्यकीय उपकरणे आणि निदान यांचे भारत प्रमुख केंद्र  असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की भारत 200 पेक्षा अधिक देशांना औषध उत्पादनांचा पुरवठा करत आहे. भारत केवळ ‘मेड इन इंडिया’ उत्पादनेच नव्हे तर ‘मेड फॉर द वर्ल्ड’ उत्पादनांची देखील निर्मिती करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औषधनिर्माण क्षेत्रातील पुरवठा साखळींच्या जागतिक असुरक्षिततेचा धोका महामारीमुळे उघडकीला आला असून औषध निर्मिती विभागाने पुढील 6 वर्षात 53 एपीआयमध्ये 6,940 कोटी रुपयांच्या आर्थिक खर्चासह घाऊक औषधांच्या देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना  सुरू केली आहे यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, महामारीने  एपीआय (APIs) आणि केएसएम (KSMs) उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या संधी देखील उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1713037) Visitor Counter : 222


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada