PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 20 APR 2021 7:05PM by PIB Mumbai

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

नवी दिल्ली/मुंबई 20 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत, वित्त विधेयक 2021 ( वित्त कायदा 2021 म्हणून 28 मार्च 2021 ला लागू करण्यात आला ) मध्ये सरकारच्या सुधारणांना पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी देण्यात आली.

प्रस्ताव सुस्पष्ट आणि सुसुत्र करण्यासाठी तसेच वित्त विधेयकात प्रस्तावित सुधारणांबाबत संबंधितांच्या चिंतांची दखल घेण्यासाठी या सुधारण आवश्यक होत्या.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारतात एकूण 12.71 कोटीहून अधिक लसीकरण मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासात 32 लाख मात्रा देण्यात आल्या

जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण अभियाना अंतर्गत भारतात आतापर्यंत 12.71 कोटी पेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 32 लाखापेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 94 व्या दिवशी (19 एप्रिल 2021) ला 32,76,555 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 22,87,419 लाभार्थींना 45,856 सत्रात पहिली मात्रा आणि 9,89,136 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

 

भारतात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात 2,59,170 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 77.67% रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 58,924 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर उत्तर प्रदेश 28,211 आणि दिल्लीत 23,686 नव्या रुग्णांची नोंद आली.

 

महाराष्ट्र अपडेट्स

राज्यातील कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य सरकारने रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्याविषयी मंगळवारी नियमावली जारी केली. गृह मंत्रालयाने भाविकांना उत्सव साधेपणाने आणि घरीच साजरा करावा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवण्याविषयी सांगितले आहे.

Image

Image

Image

* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713036) Visitor Counter : 200