उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
20 APR 2021 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी राम नवमीनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे -
‘राम नवमी’ च्या पवित्र प्रसंगी मी देशातील जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
भगवान राम हे सद्गुण , चांगुलपणा, धैर्य आणि करुणेचा अवतार होते. राम नवमी उत्सव आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांच्या आदर्श जीवनाची आठवण करून देतो आणि त्यांनी आपल्याला दाखवलेल्या नीतित्तेच्या मार्गावरून जाण्यासाठी मार्गदर्शन करतो. तसेच आपणा सर्वाना आपले कुटुंब, समाज आणि देशाबद्दलची आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांची आठवण करून देतो.
भगवान राम यांची न्याय, सुशासन आणि जनतेप्रति बांधिलकी मानवतेला सदैव प्रेरणा देईल.
आपल्या देशात, सण -उत्सव हे कुटुंब आणि मित्रांबरोबर एकत्रितपणे आनंद साजरा करण्यासाठी एक उत्तम संधी असते मात्र कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, मी माझ्या सहकारी नागरिकांना घरीच हा उत्सव साजरा करण्यासाठी आणि कोविड प्रतिबंधक आरोग्य आणि स्वच्छता नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतो.
हा उत्सव आपल्या जीवनात आनंद आणि शांती घेऊन येवो, भगवान राम यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांनी परिपूर्ण जग निर्माण करण्याची प्रेरणा देवो. "
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712959)
Visitor Counter : 148