गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय मंत्रिमंडळाने बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 ए आणि टप्पा 2 बी ला दिली मंजुरी
Posted On:
20 APR 2021 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 एप्रिल 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा 2 ए (केंद्रीय रेशीम बोर्ड जंक्शन ते के.आर. पूरम) आणि टप्पा 2 बी (के. आर. पुरम ते विमानतळ हेब्बल जंक्शनमार्गे ) या एकूण 58.19 कि.मी. लांबीच्या मार्गाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 14,788.101 कोटी रुपये आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे बंगळुरूला आवश्यक अतिरिक्त सार्वजनिक वाहतुकीची पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहे.
उद्दिष्टे
या प्रकल्पामुळे बंगळुरूमधील शहरी वाहतूक व्यवस्थेत एकसंधता येईल. खासगी वाहनांची वाढती संख्या आणि शहरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेले बांधकाम यामुळे प्रवासी पायाभूत सुविधा आणि औद्योगिक कामांवर ताण पडत आहे , तो दूर करणे आणि लोकांना सुरक्षित, विश्वसनीय आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक पुरवणे हा यामागचा उद्देश आहे.
मेट्रो प्रकल्प शहरी वाहतुकीच्या पारंपारिक प्रणालीतील एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पात कार्यक्षम आणि प्रभावी पद्धतीने इतर शहरी वाहतूक प्रणालीमध्ये एकात्मीकरण केले आहे, जे केवळ डिझाइनिंग, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक व्यवस्थापनच्या अभिनव पद्धतींचा अवलंब केल्यामुळे शक्य झाले आहे.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712911)
Visitor Counter : 198