विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय हवामान असुरक्षा मूल्यांकनानुसार पूर्वेकडील आठ राज्य हवामानदृष्या अत्यंत असुरक्षित
Posted On:
17 APR 2021 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2021
आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय हवामान असुरक्षा मूल्यांकन अहवालात झारखंड, मिझोरम, ओदिसा, छत्तीसगड, आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये हवामान बदलाच्या परिस्थितीसाठी अत्यंत असुरक्षित असल्याचे नमूद केले आहे. या राज्यांमध्ये आणि मुख्यत: देशाच्या पूर्वेकडील भागात अनुकूलन उपाययोजनांना प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे देखील अहवालात नमूद केले आहे.
डीएसटी सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी आज, सध्याच्या हवामानातील वाढती जोखीम आणि असुरक्षिततेसाठी कारणीभूत असणारे मुख्य घटक यांच्या संदर्भात भारतातील सर्वाधिक असुरक्षित राज्ये आणि जिल्ह्यांची ओळख पटविणारा ‘सर्वसाधारण आराखडा वापरून भारतातील अनुकूलन नियोजनासाठी हवामान असुरक्षितता मूल्यांकन’ या शीर्षका अंतर्गत एक अहवाल प्रसिद्ध केला.
हे मुल्यांकन धोरणकर्त्यांना हवामान संदर्भातील योग्य कृतींचा अवलंब करण्यास सहाय्य करतील. योग्यप्रकारे आरेखित केलेल्या हवामान बदल अनुकूलन प्रकल्पांच्या विकासाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील हवमान-असुरक्षित समुदायांना याचा फायदा होईल.
डीएसटी, हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजनेचा एक भाग म्हणून हवामान बदलावरील 2 राष्ट्रीय मोहिमा राबवित आहे. हिमालयीन परिसंस्था शाश्वत करण्यासाठी राष्ट्रीय मिशन (NMSHE) आणि हवामान बदलासाठी धोरणात्मक ज्ञानावर राष्ट्रीय मिशन (NMSKCC) या मोहिमेचा एक भाग म्हणून, डीएसटी 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य हवामान बदल कक्षाला सहाय्य करत आहे.
Full Report: https://dst.gov.in/sites/default/files/Full%20Report%20%281%29.pdf
* * *
S.Thakur/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712469)
Visitor Counter : 261