वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

महाराष्ट्राला देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती


सध्या देशात क्षमतेच्या 110% टक्के ऑक्सिजन निर्मिती सुरु असून औद्योगिक वापरासाठी उपलब्ध असलेला सर्व ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी वळवला जात आहे- पीयूष गोयल

Posted On: 17 APR 2021 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 एप्रिल 2021

 

देशातली परिस्थिती लक्षात घेऊन देशात जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती होईल, यासाठी केंद्र सरकार सर्व संबंधित घटकांसोबत, पूर्ण प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्री रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री, तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. या संदर्भात केलेल्या एका ट्विट मध्ये त्यांनी सांगितले की, सध्या देशात एकूण क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत आहे. तसेच औद्योगिक वापरासाठी असलेल्या सर्व ऑक्सिजनचा साठा वैद्यकीय वापराकडे वळवण्यात आला आहे. केंद्र सरकार, सर्व राज्यांच्या सतत संपर्कात असून, त्यांच्या आवश्यकता समजून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही गोयल यांनी सांगितले. कालच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र आणि राज्याने या संकटकाळात परस्पर समन्वयाने काम करावे, अशी सूचना केल्याचे गोयल यांनी सांगितले.

या मुद्यावर राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या राजकारणबाबत खेद व्यक्त करत, महाराष्ट्राला आजवर देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा झाला आहे, अशी माहिती गोयल यांनी या ट्विट्समध्ये दिली आहे.   

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001CPDK.jpg


* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712449) Visitor Counter : 193