संरक्षण मंत्रालय
राज्य सैनिक मंडळाच्या पश्चिम क्षेत्राची चौथी बैठक नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संपन्न
प्रविष्टि तिथि:
16 APR 2021 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 एप्रिल 2021
राज्य सैनिक मंडळाची (RSBs), चौथी बैठक आज नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली. माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव, श्री रविकांत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
यावेळी पश्चिम क्षेत्रीय बैठकीच्या तिसऱ्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या कामांविषयीच्या कार्यवाही अहवालावर चर्चा करण्यात आली. यात, माजी सैनिकांना रोजगारात आरक्षण देणे, राज्य कर्मचाऱ्यांची कमतरता, राज्य सैनिक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, विविध कल्याणकारी योजनांचा निधी लाभार्थ्यांना मिळण्यात होत असलेला विलंब, नव्या माजी सैनिक योगदान आरोग्य योजनेअंतर्गत सर्वोपचार रुग्णालयांची सुरुवात,लष्कराचे नवे सीएसडी कॅन्टीन सुरु करणे आणि निवृत्तीवेतनाचे प्रश्न, अशा विविध विषयांचा यात समावेश होता.
राज्य सैनिक मंडळाने उपस्थित केलेल्या मुद्यांवर त्वरित आणि कालबद्ध कार्यवाही करण्यासाठी सचिव रविकांत यांनी काही निर्देश दिले. या समस्या सोडवण्यासाठी, माजी सैनिक कल्याण विभाग आणि केंद्रीय सैनिक मंडळ, राज्य मंडळाला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1712303)
आगंतुक पटल : 260