गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

ईटस्मार्ट सिटी आणि सर्वांसाठी वाहतूक आव्हानांचा प्रारंभ



ईटस्मार्ट सिटी आव्हानामुळे आहारविषयक योग्य प्रथा आणि सवयी यासाठी वातावरण निर्मिती होणार

सार्वजनिक वाहतूक सुरक्षित, किफायतशीर, आरामदायी आणि खात्रीशीर करण्याचा ट्रान्सपोर्ट फॉर ऑल आव्हानाचा उद्देश

Posted On: 15 APR 2021 10:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह निर्माण आणि नागरी व्यवहार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंह पुरी यांनी आज ईटस्मार्ट सिटी आणि ट्रान्सपोर्ट फॉर ऑल आव्हानांचा दुरदृष्य प्रणालीद्वारे प्रारंभ केला. गृह निर्माण आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यावेळी उपस्थित होते.

ईट राईट इंडिया दृष्टीकोन, स्मार्ट सिटी आव्हानाच्या प्रारंभामुळे स्मार्ट सिटी स्तरापर्यंत पोहोचवण्यात येत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे हरदीप पुरी यांनी सांगितले. ही चळवळ शहरातील नागरिकांना योग्य अन्नाची निवड करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न राष्ट्र उभारण्यासाठी मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोविड-19 चा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रापैकी एक क्षेत्र वाहतूक आहे असे त्यांनी सर्वांसाठी वाहतूक ट्रान्सपोर्ट फॉर ऑलआव्हानाचा प्रारंभ करताना सांगितले. ट्रान्सपोर्ट फॉर ऑल डिजिटल नवोन्मेश आव्हानामुळे, कोरोनामुळे निर्माण झालेल्या या वाहतूक विषयक पेचातून बाहेर पडण्यासाठी शहरांना मदत होईल असे ते म्हणाले.

अन्नविषयक आरोग्यदायी, सुरक्षित आणि शाश्वत वातावरणाला पोषक असा आराखडा विकसित करण्यासाठी स्मार्ट शहराना प्रोत्साहन देण्याचा इट स्मार्ट सिटी आव्हानाचा उद्देश आहे. त्याला अन्नविषयक समस्यांचे निराकरण करणाऱ्या स्मार्ट उपायांची आणि संस्थात्मक, सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांची जोड हवी. सार्वजनिक वाहतूक सुरक्षित, किफायतशीर, आरामदायी आणि खात्रीशीर करणारे  डिजिटल उपाय विकसित  करण्याचा ट्रान्सपोर्ट फॉर ऑल डिजिटल नवोन्मेश आव्हानाचा उद्देश आहे.

ईटस्मार्ट सिटी आव्हान

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत एफएसएसएआय अर्थात  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सुरु केलेल्या ईट राईट  इंडिया चळवळीने लोकांमध्ये सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नाबाबत जागृती  निर्माण करण्याचा मार्ग चोखाळला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या सहकार्याने ईट स्मार्ट सिटी आव्हानाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

ईट स्मार्ट सिटी आव्हानामुळे लोकांना योग्य आहारासाठी प्रोत्साहन मिळून  शहरातल्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल असे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल म्हणाले.

सर्व स्मार्ट सिटी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या आणि 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे या आव्हानात  सहभागी होऊ शकतात. आव्हानाच्या पहिल्या टप्याअखेर 11 शहरांची त्यांचा दृष्टीकोन राबवण्यासाठी वाढीव कालावधीकरिता निवड करण्यात येईल.        

(https://eatrightindia.gov.in/eatsmartcity )

ट्रान्सपोर्ट फॉर ऑलआव्हान

वाहतूक आणि विकास धोरण संस्थेच्या सहकार्याने केंद्रिय गृह निर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने ट्रान्सपोर्ट फॉर ऑलआव्हानाला प्रारंभ केला आहे.  सर्व नागरिकांच्या आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने उपाय विकसित करून सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा घडवून आणण्यासाठी  नागरिक, नागरिक समूह आणि स्टार्ट अप्स यांनी एकत्र यावे हा या आव्हानामागचा उद्देश आहे.

या आव्हानाच्या पहिल्या टप्यात डिजिटल नवोन्मेषावर भर देण्यात आला आहे.

सर्व स्मार्ट सिटी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या आणि 5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे या आव्हानात  सहभागी होऊ शकतात.

या आव्हानाचे तीन टप्पे-

1.. समस्या निश्चिती स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने श्रातल्या नागरिक आणि सार्वजनिक वाहतूक दारांना येणाऱ्या समस्या निश्चित करणे

2.. उपाय शोधणे शहरे आणिस्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्यासाठी स्टार्ट अप्स उपाय विकसित करतील

3.. प्रायोगिक चाचणी- शहरामध्ये याची मोठ्या प्रमाणावर प्रायोगिक चाचणी घेतली जाईल आणि त्यावर नागरिकांचा प्रतिसाद  लक्षात घेऊन तोडगा निश्चित केला जाईल.

या आव्हानाचा भाग म्हणून ट्रान्सपोर्ट फॉर ऑल कृती दलाची स्थापना करण्यात येईल. यात महापालिका, स्मार्ट सिटी एसपीव्ही, शहर बस परिवहन, मेट्रो आणि उपनगरी रेल्वे, वाहतूक पोलीस, शाश्वत वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादी संबंधितांचा यात समावेश राहील.

(www.transport4all.in )

स्मार्ट सिटी अभियानाबाबत अद्ययावत माहिती

गेल्या वर्षभरात या अभियानाने स्मार्ट सिटी सह प्रकल्प अंमलबजावणीला वेग देत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे. 

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712143) Visitor Counter : 228