आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्धतेविषयी अद्ययावत माहिती
Posted On:
15 APR 2021 9:45PM by PIB Mumbai
कोविड परिस्थितीत अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजनची उपलब्धता याविषयी अधिकारीक गट 2 (EG2) ची बैठक आज पार पडली. यात तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले.
i. 12 उच्च रुग्णसंख्या असलेल्या राज्यांतील ऑक्सिजन स्त्रोतांचे मॅपिंग -कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजन अतिशय महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांकडून वैद्यकीय ऑक्सीजीनची मोठी मागणी आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन उत्पादन क्षमतेपेक्षा मागणी अधिक आहे.
ऑक्सिजनच्या मागणीवर डिपीआयआयटी, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पोलाद मंत्रालय, विविध राज्ये, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्था यासारख्या अनेक भागीदार संस्थांनी मॅपींग उपक्रम राबवला. वैद्यकीय ऑक्सिजनचे स्रोत आणि उत्पादनाविषयी राज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार, या 12 राज्यांना 4880 MT, 5619 MT आणि 6593 MT वैद्यकीय ऑक्सिजन 20 एप्रिल, 25 एप्रिल आणि 30 एप्रिल रोजी पुरवण्यात येणार आहे. तशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालय जारी करणार आहे आणि केंद्रीय गृहमंत्रालय ती अधिसूचीत करेल.
ii. पीएसए निर्मितीसाठी आणखी 100 रुग्णालयांची निवड : Pressure Swing Adsorption (PSA) प्लान्टसच्या माध्यमातून रुग्णालयांना वैद्यकीय ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी करण्यात येईल. यामुळे राष्ट्रीय ग्रीडवरील ऑक्सिजन पुरवठ्याचा ताण कमी होईल. यासाठी पीएम-केअर्समधून मंजूर करण्यात आलेले 162 PSA प्लान्टसच्या लवकर उभारणीसाठी अवलोकन करण्यात येत आहे. तसेच ईजी2 ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला आणखी 100 रुग्णालयांमध्ये पीएसए प्लान्टची निर्मिती करण्यास मंजूरी देण्याची सूचना केली आहे.
iii. 50,000 मेट्रीट टन वैद्यकीय ऑक्सिजनची आयात : वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता, अधिकारिक गट-2 यांनी 50,000 मेट्रीक टन ऑक्सिजन आयातीची निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712139)
Visitor Counter : 295