कृषी मंत्रालय

संयुक्त राष्ट्र अन्न प्रणाली परिषद 2021 वर भारतातर्फे राष्ट्रीय संवादाचे आयोजन

Posted On: 15 APR 2021 8:30PM by PIB Mumbai

 

शाश्वत विकासासाठी 2030 विषयसूचीचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी जगातील कृषी-खाद्य प्रणालींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अवलंबलेल्या रणनीतीचा आराखडा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांनी सप्टेंबर 2021 पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र अन्न प्रणाली परिषद  (युएन फूड सिस्टम्स समिट) आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. या परिषदेमध्ये शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) साध्य करण्यासाठी वेगवान प्रगती करण्यासाठी राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील खाद्यप्रणालींना आकार प्राप्त करून देणाऱ्या मार्गांवर लक्ष केंद्रित केले जाईल. परिषद 2021 चे आयोजन सहभागात्मक आणि विचारविनिमय पद्धतीने करण्याचे नियोजन आहे आहे तसेच सुरक्षित आणि पौष्टिक आहार, शाश्वत उपभोग पद्धती, निसर्ग-सकारात्मक उत्पादन, न्याय्य उदरनिर्वाह आणि असुरक्षा, धक्का आणि तणाव यांच्या लवचीकतेशी संबंधित पाच अ‍ॅक्शन ट्रॅकसाठी राष्ट्रीय, उप-राष्ट्रीय (राज्य) आणि स्वतंत्र सल्लामसलत यांच्या माध्यमातून आलेल्या अनुभवांच्या आधारे अमुलाग्र बदल करणाऱ्या कल्पनांची आवश्यकता आहे. संपूर्ण देशात उद्रेक झालेल्या कोविड-19 साथीच्या रोगामुळे अन्न आणि संबंधित प्रणालीती मानवतेला भेडसावणारी अस्थिरता आणि आव्हाने समोर आली आणि उत्पादन, वितरण आणि उपभोग आधारित संपूर्ण कृषी-खाद्य प्रणालींमधील विशिष्ट पीक किंवा शेतीपद्धतींच्या पलीकडे जाऊन आपल्या कृती आणि धोरणांची पुनर्रचना करण्याची गरज समोर आली आहे.

या अन्न प्रणाली परिषदेत जगातील जवळजवळ 18% मनुष्यबळ असणार्‍या भारताचा वाटा मोठा आहे. या प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी सरकारने नीती आयोगाचे सदस्य प्रा.रमेश चंद, यांच्या अध्यक्षतेखाली कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्रामीण विकास आणि इतरांच्या प्रतिनिधींसह उच्चस्तरीय आंतर-विभागीय गट स्थापन केला आहे. या गटाला नियुक्त केलेले मुख्य कार्य म्हणजे कृषि-खाद्य प्रणाली निर्माण करण्यासाठी भारतामध्ये टिकाऊ व न्याय्य अन्न प्रणाली तयार करण्याच्या राष्ट्रीय मार्गांचा शोध घेण्यासाठी सर्व भागधारकांसह राष्ट्रीय संवाद आयोजित करणे आणि सध्याच्या आणि भविष्यातील गरजा भागविण्यासाठी जागतिक खाद्य प्रणालीत परिवर्तनास योग्य योगदान देणे हे होय. सल्लामसलत प्रक्रियेचा समारोप सप्टेंबर 2021 रोजी होणार्‍या अन्न प्रणाली परिषदेत होईल ज्यामध्ये पंतप्रधान इतर जागतिक नेत्यांसमवेत भाग घेण्याची शक्यता आहे.

***

S.Thakur/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712119) Visitor Counter : 286


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi