पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

हायड्रोजन इकोसिस्टम विकासाच्या दिशेने भारताची वाटचाल

Posted On: 15 APR 2021 4:18PM by PIB Mumbai

 

हायड्रोजन इकोसिस्टम विकासाची सुरुवात करण्यासाठी भारत विविध पैलूंचा विचार करत आहे असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सांगितले. *** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

quot;">“हायड्रोजन अर्थव्यवस्था: नवी दिल्ली संवाद – 2021, या विषयावरील हायड्रोजन गोलमेज परिषदेला  संबोधित करताना ते म्हणाले की, भारतातील इंधन  मिश्रणात हायड्रोजनचा जास्त उपयोग करण्याबाबत आम्ही विविध उपक्रम राबविले आहेत. हायड्रोजन रोडमॅप तयार करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2021 मध्ये राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली आहे. आम्ही नील हायड्रोजन, हायड्रोजन सीएनजी (एच-सीएनजी) आणि हरित हायड्रोजन या पथदर्शी प्रकल्पावर काम करत आहोत. परिवहन इंधन तसेच रिफायनरीजमध्ये औद्योगिक इनपुट म्हणून वापरासाठी आम्ही तांत्रिक प्रगतीद्वारे सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) सह हायड्रोजनचे मिश्रण करीत आहोत. दिल्लीतील 50 बस प्रायोगिक तत्वावर कंप्रेस्ड नॅचरल गॅसमध्ये मिश्रित हायड्रोजनवर चालत आहेत. येत्या काही महिन्यांत भारतातील मोठ्या शहरांमध्ये हा आकडा वाढविण्याची आमची योजना आहे.

आपल्या वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी इंधन अविभाज्य घटक आहे आणि आम्ही विकासकेंद्री, उद्योग-अनुकूल आणि पर्यावरण-जागरूक ऊर्जा क्षेत्राचा विकास करीत आहोत.

भारताच्या उर्जा संक्रमणाची आकडेवारी वेगाने बदलत आहे असे प्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सात प्रमुख घटकांसह भारताच्या नवीन ऊर्जा नकाशाची रूपरेषा तयार केली आहे आणि त्यापैकी एक म्हणजे उदयोन्मुख इंधनांचा विकास, विशेषत: हायड्रोजन." सरकार स्वावलंबी भारत किंवा आत्मनिर्भर भारतासाठी एक रोडमॅप विकसित करीत आहे, जो जागतिक स्तरावरील पुरवठा शृंखलेसह भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब विकसित करू इच्छितो. या प्रयत्नात, उर्जेची एक परिभाषित भूमिका असेल.

***

Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor

हायड्रोजन इकोसिस्टम विकासाच्या दिशेने भारताची वाटचाल

(Release ID: 1712077) Visitor Counter : 232


Read this release in: Punjabi , English , Urdu , Hindi