आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारतच्या तिसऱ्या वर्धापन दिनी डॉ. हर्षवर्धन यांनी आरोग्यविषयक लोकचळवळीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून घेतली प्रेरणा
आतापर्यंत 75,532 आरोग्य केंद्रे कार्यान्वित
पंतप्रधानांनी, लोकांना केवळ दर्जेदार प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्नच पाहिले नाही तर ते त्यांनी सत्यात देखील उतरविले : डॉ. हर्षवर्धन
Posted On:
14 APR 2021 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2021
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुष्मान भारत- आरोग्य केंद्राच्या (एचडब्ल्यूसी) तिसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम संपन्न झाला. आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद के पॉल हे देखील आभासी पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
डॉ हर्ष वर्धन यांनी या कार्यक्रमात आनंद व्यक्त करताना, तीन वर्षांपूर्वी (2018 मध्ये) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील जंगला येथे पहिल्या आयुष्मान भारत- आरोग्य केंद्राचे उद्घाटन केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्याच्याकडून प्रेरणा घेताना ते म्हणाले, "ही केंद्रे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाशी अनुरूप आहेत जी सर्वांना आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी समाजात मानवी प्रतिष्ठा, समता व सामाजिक न्याय स्थापन करण्याच्या आमच्या प्रयत्नांना प्रेरणा देते.”
आरोग्य सेवा प्रणालीचा कणा बनलेल्या एचसीडब्ल्यूच्या भूमिकेवर भर देताना मंत्री म्हणाले, “पंतप्रधानांनी लोकांना केवळ दर्जेदार प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्वप्नच पाहिले नाही तर ते त्यांनी सत्यात देखील उतरविले,” आणि एक लोकचळवळ म्हणून आरोग्याला संस्थात्मक रूप प्रदान करण्यात हे पाऊल कसे महत्त्वपूर्ण ठरेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले. देशभरात महामारीची परिस्थिती असताना देखील, भारताने आतापर्यंत 75,532 एचडब्ल्यूसी कार्यान्वित केले आहेत आणि डिसेंबर 2022 पर्यंत 1.5 लाख एचडब्ल्यूसी कार्यान्वित करण्याच्या मार्गावर आहेत.
डॉ. हर्ष वर्धन यांनी प्राथमिक स्तरावर सामान्य आपत्कालीन परिस्थिती, भाजणे आणि गंभीर आघात व्यवस्थापनासाठी परिचालन मार्गदर्शक सूचना, एचडब्ल्यूसीमध्ये उपशामक सेवेसाठी परिचालन मार्गदर्शक सूचना, एचडब्ल्यूसीमध्ये वृद्धांची देखभाल करण्यासाठी परिचालन मार्गदर्शक सूचना, एचडब्ल्यूसी आणि ग्रामीण आरोग्य सांख्यिकी - 2019-20 (मार्च 2020 पर्यंत) याविषयीच्या 12 सेवांचे पोस्टर जारी केले.
19 राज्ये (पंजाब, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, सिक्किम, मेघालय, नागालँड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, मिझोरम, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आसाम, गोवा, मणिपूर) आणि 5 केंद्रशासित प्रदेश ( पुद्दुचेरी, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दीव, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप) यांनी वर्ष 2020-21 वर्षातील उद्दिष्टाच्या तुलनेत 100% यश संपादन केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
मिझोरम, मेघालय, राजस्थान यांचा एबी-एचडब्ल्यूसीमध्ये कल्याणकारी उपक्रमांच्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. केरळ, तेलंगणा, गुजरात यांना एबी-एचडब्ल्यूसीमध्ये बिगर-संसर्गजन्य रोगांच्या तपासणीसाठी अपवादात्मक कामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले. हरियाणा, त्रिपुरा आणि छत्तीसगड यांना 31 मार्च 2021 पर्यंत एबी-एचडब्ल्यूसीने, एचडब्ल्यूसी अॅप मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केल्याबद्दल गौरविण्यात आले.
* * *
S.Patil/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711878)
Visitor Counter : 292