पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

हायड्रोजन आधारित अर्थव्यवस्था - नवी दिल्ली संवाद 2021


पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एफआयपीआय आणि ऊर्जा मंचाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हायड्रोजन गोलमेज परिषद 15 एप्रिल 2021 रोजी

Posted On: 14 APR 2021 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2021

 

भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या ऊर्जा मंच  (टीईएफ) आणि फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री (एफआयपीआय-भारतीय पेट्रोलियम उद्योग संघ), संयुक्त विद्यमाने "हायड्रोजन इकॉनॉमी-इंडियन डायलॉग-2021" ही गोलमेज परिषद आयोजित करत आहेत. 15 एप्रिल 2021 रोजी आभासी माध्यमाद्वारे ही परिषद होईल. उदयोन्मुख हायड्रोजन परिसंस्था  आणि सहयोग, सहकार्य आणि एकत्रितपणे काम करण्यासाठी  संधी शोधण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

हवामानाप्रती आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचा पाठपुरावा आणि हवामान बदलाच्या समस्यांवर मात करण्यासाठी  जगभरातून जसजशी वेगाने पावले उचलली जात आहेत, तसतसे  ऊर्जा तुटवडा भरून काढण्याचा स्रोत म्हणून आणि पारंपारिक इंधनांसाठी एक स्वतंत्र स्रोत म्हणून हायड्रोजनचे  महत्त्व वाढत चालले आहे.

हायड्रोजन गोलमेज परिषद अशा प्रकारचा  पहिला उपक्रम असून, उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय  सत्र यात असतील.  त्यानंतर जगातील विविध भौगोलिक क्षेत्रातील प्रख्यात धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि उद्योजक यांची  पाच पॅनेल चर्चासत्रे होतील. करण्यात येतील, ज्यामध्ये धोरण आराखडा  आणि हयड्रोजनची मागणी व पुरवठा यावर लक्ष केंद्रीत केले जाईल.

या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान असून उद्घाटन सत्रात त्यांचे बीजभाषण होईल.

भारताच्या हायड्रोजन अभियानासाठी विशेष सत्र आयोजित केले असून यात नूतन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय सचिव डॉ. इंदू शेखर चतुर्वेदी यांचे बीजभाषण होईल.

गोलमेज परिषदेत जगभरातून सुमारे 3000 जण सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 15 एप्रिल 2021 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजल्यापासून www.futureenergyasia.com/hydrogen-economy वर कार्यक्रम पाहता येईल.

 

* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1711839) Visitor Counter : 248


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi