निती आयोग

भविष्यात नवोन्मेषक आणि उद्योजक तयार करण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन आणि डॅसॉल्ट सिस्टीम्स फाउंडेशनमध्ये भागीदारी

Posted On: 14 APR 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 एप्रिल 2021

 

भारतात नवोन्मेशाची डिजिटल समृद्ध व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील तरुणांमध्ये एसटीईएम आधारित नवोन्मेश आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), नीती आयोगाने, आज डॅसॉल्ट सिस्टीम्स फाउंडेशन सोबत एका करारावर स्वाक्षरी केली.

अटल इनोव्हेशन मिशन च्य शीर्ष कार्यक्रमांपैकी एक, अटल टिंकरिंग लॅबने (एटीएल) शालेय मुलांमध्ये सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वृद्धिंगत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 3डी तंत्रज्ञान आणि आभासी विश्वाच्या सहाय्याने डॅसॉल्ट सिस्टीम्स फाउंडेशन भारतातील शैक्षणिक आणि संशोधनाचे भविष्य बदलण्यासाठी समर्पित आहे, प्रकल्प-आधारित, स्व-वेगवान शिक्षण सामग्री, हॅकॅथॉन आणि आव्हाने आणि आंतर-देश शैक्षणिक सहयोग या तीन विस्तृत क्षेत्रात अटल टिंकरिंग लॅब कार्यक्रमात योगदान देण्यास तयार आहे.

डॅसॉल्ट सिस्टम फाउंडेशन त्याच्या सीएसआर उद्दीष्टांचा भाग म्हणून हा उपक्रम विकसित केला आहे, जे ‘रेडी टू युज’ चा प्रारंभिक सेट असलेले एक सेल्फ-लर्निंग ट्रेनिंग कम इंस्ट्रक्शनल प्लेबुक आहे, ज्यात व्हिज्युअल समजून घेण्यासाठी उपयोगी व्हिडिओ आहेत जे अटल टिंकरिंग लॅबचे  विद्यार्थ्यांसोबत डिजिटल पद्धतीने सामायिक केले जाऊ शकतो.

या कराराअंतर्गत डॅसॉल्ट सिस्टम फाउंडेशनहे  अटल टिंकरिंग लॅबसाठी नाविन्यपूर्ण आव्हाने / हॅकाथॉनचे आयोजन करेल, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये समस्या सोडवणारी कौशल्ये, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान आधारित शोध घेण्याचे कौशल्य आणि नवोन्मेश संस्कृती वृद्धिंगत होईल. आज कराराच्या स्वाक्षरीच्या आभासी सत्रादरम्यान बोलताना,   नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर रामानन यांनी सांगितले “डॅसॉल्ट सिस्टीम फाउंडेशन सह अटल इनोव्हेशन मिशनची भागीदारी सुरू करणे ही आमच्यासाठी मानाची गोष्ट आहे. डॅसॉल्ट सिस्टीम्स हे मोठ्या प्रमाणात मिशन क्रिटिकल सिस्टमचे डिझाइन तयार करणे आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक अव्वल क्रमांकाचे उद्योजक आहेत.

अटल इनोव्हेशन मिशनबरोबरच्या सहकार्याबद्दल आपले विचार व्यक्त करताना, डॅसॉल्ट सिस्टीम्स फाउंडेशन, भारत,  संचालक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन मोगासळे म्हणाले, “भारतात डॅसॉल्ट सिस्टीम फाउंडेशनची  स्थापना झाल्यापासून, आम्ही नाविन्यपूर्णता आत्मसात करण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत असून  आपल्या पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज होण्यास सक्षम बनवित आहोत. अटल इनोव्हेशन सोबत याला एक नवीन आयाम प्राप्त होईल.”

या सहकार्यातून अटल इनोव्हेशन मिशन आणि डॅसॉल्ट सिस्टीम्स फाउंडेशन एकत्रितपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण, कौशल्य आणि विद्यार्थ्यांमधील सांस्कृतिक संवादांसाठी शाळा आणि शालेय विद्यार्थ्यांमधील आंतर-देशी सहकार्यांना प्रोत्साहित करेल.

 

* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711834) Visitor Counter : 148