आयुष मंत्रालय
आयुष मंत्रालयाच्या इंडियन मेडिसीन फार्मास्युटीकल्स काॅरपोरेशन लिमिटेड या उत्पादन विभागाने सर्वाधिक उलाढाल करत, 160 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचा ओलांडला टप्पा
Posted On:
14 APR 2021 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2021
आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादन उद्योग विभाग, इंडियन मेडिसिन फार्मास्युटीकल्स कॉरपोरेशन लिमिटेड (IMPCL) या कंपनीने आपल्या उत्पादनांच्या विक्रीत विस्मयकारक वाढ दर्शविली असून 2020-21 या आर्थिक वर्षात 164.33 कोटी रुपयांची (अंदाजित आकडेवारी) उलाढाल केली आहे. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक आकडेवारी आहे आणि यावर्षी सर्वकालीन उत्तम, सुमारे 12 कोटींच्या नफ्याची नोंद झाली आहे. गतवर्षी 2019-20 या वर्षात कंपनीच्या महसूलाचे मूल्य 97 कोटी रुपये इतके चांगले होते. आयुषची उत्पादने आणि सेवा यांचा कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिक वेगाने स्विकार करत असल्याचे ही वृध्दी दर्शवित आहे.
याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकतीच 18 आयुर्वेदिक उत्पादनांना, मार्च 2021 मधे काही निरीक्षणांसह WHO-GMP/CoPP प्रमाणपत्र देऊन आयएमपीसीएलच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. जागतिक आरोग्य संघटना औषध कंपन्यांना तपासणी करून जागतिक आरोग्य संघटना/उत्तम उत्पादन पध्दती/औषधी उत्पादने प्रमाणपत्र (WHO-GMP/CoPP) देते. हे प्रमाणपत्र म्हणजे आयएमपीसीएलच्या उत्पादनांवर गुणवत्तेची मोहोर उठविल्यासारखे आहे. यामुळे आयएमपीसीएलला आपली दर्जेदार उत्पादने जागतिक स्तरावर निर्यात करण्याचा आरंभ करण्यास मदत होईल.
आयएमपीसीएल (IMPCL) ही आयुष उत्पादने तयार करणारी, आयुष औषधांची देशातील सर्वात विश्वसनीय उद्योग कंपनी असून त्यातील निर्मितीसूत्रांच्या शुद्धतेसाठी (अस्सलतेसाठी)प्रसिद्ध आहे. कोविड -19 महामारीच्या काळात ती देशातील गरजा कमीत कमी कालावधीत पूर्ण करणारी कंपनी ठरली असून, ती प्रतिबंधात्मक शक्ती वाढविणारी औषधे उदाहरणार्थ इम्युनोबुस्टींग किट उपलब्ध करणारी पहिली औषध कंपनी होती.केवळ 350 रुपये किमतीचे हे अशा प्रकारचे सर्वात स्वस्त किट असून ते एमेझॉनवरही उपलब्ध आहे. अशा सुमारे 2 लाख कीट्सची विक्री गेल्या दोन महिन्यात झाली.
सध्या, आयएमपीसीएल विविध आजार श्रेणींवरील वैशिष्ट्यपूर्ण अशी 165 आयुर्वेदिक, 332 युनानी आणि 71स्वतः च्या निर्मितीसूत्रांची आयुर्वेदिक औषधे निर्माण करत आहे. त्यांनी संशोधन आणि विकासात्मक अशा कार्यात योगदान दिले असून, अत्यावश्यक औषध यादीनुसार (EDL) स्वतःच्या अधिकारातील नवी 25 औषधे ती तयार करत आहे.
कोविड-19 महामारीच्या काळात विविध आरोग्य उपक्रमांना स्थिर पाठिंबा देऊन आणि उत्पादनांचा अखंडीत पुरवठा सुनिश्चित केल्याबद्दल आयएमपीसीएलच्या सोबत व्यवसाय करणाऱ्या,प्रत्येक शासकीय संस्थेने तिची प्रशंसा करत आहे.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711777)
Visitor Counter : 249