ग्रामीण विकास मंत्रालय

सामाजिक कृती समितीच्या सदस्यांनी सादर केल्या सर्वोत्कृष्ट आचरण पद्धती

Posted On: 13 APR 2021 9:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021

 

भारत @75 स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव या 75 आठवडे चालणाऱ्या सोहळ्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च 2021 रोजी केला. या महोत्सवांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण आजिविका मिशनची (DAY-NRLM) अंमलबजावणी ग्रामविकास मंत्रालयाने केली. सर्व राज्यांनी 22 ते 28 मार्च विभागीय पातळीवर दूरदृश्य सत्रांचे आयोजन करुन लैंगिक भेद दूर करण्यासाठी केलेल्या उत्तम आचरण पद्धती सामायिक केल्या. महिलांनी आपल्या हक्कांविषयीचे अनेक प्रेरणादायी अनुभव सामायिक केले.

30 राज्य/ कें. प्रदेशांनी आयोजित केलेल्या विविध सत्रांमध्ये 86,539 जणांनी सहभाग नोंदवला.

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1711604) Visitor Counter : 273


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi