वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते ॲक्वा-फार्मर्स आणि खरेदीदार यांना जोडणाऱ्या मंचाचे, ई-सँटा या इलेक्ट्रॉनिक बाजाराचे उद्घाटन
उत्पन्न, राहणीमान, स्वनिर्भरता, गुणवत्ता यांचा विकास, उत्पादकांना शोधणे तसेच आपल्या ॲक्वा-फार्मर्सना नवीन पर्याय उपलब्ध करून देणे हे या मंचामुळे शक्य होईल
Posted On:
13 APR 2021 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज ॲक्वा-फार्मर्स आणि खरेदीदार यांना जोडणाऱ्या ई-सॅन्टा या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेचे दूरदृश्य प्रणालीद्वार उद्घाटन केले. यामुळे शेतकऱ्यांना मालाची उत्तम किंमत मिळेल तसेच उत्पादकांचा शोध घेता येत असल्यामुळे निर्यातदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादने शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करता येतील. उत्पादकांपर्यंत पोहोचता येणे ही आंतरराष्ट्रीय बाजारातील विकासाची गुरुकिल्ली आहे. ई-सॅन्टा हे वेब पोर्टल चे नाव इलेक्ट्रॉनिक सोल्युशन फॉर ॲग्युमेंटींग NaCSA फार्मर्स ट्रेड इन ॲक्वाकल्चर यावरून तयार करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शाश्वत जल शेती केंद्र हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या समुद्री उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे विस्तारित प्रारूप आहे. या यशामुळे तोंडी प्रसिद्धी हा उद्योगांच्या विकासाचा पारंपारिक पाया जाऊन उद्योग अधिकाधिक नियोजन पूर्ण आणि कायदेशीररित्या सुघड होतील.
बाजारपेठेतील दरी सांधण्यासाठी ई-सँटा हा डिजीटल पूल असल्याचे स्पष्ट करत मंत्रीमहोदयांनी ॲक्वाफार्मर्स आणि खरेदीदार यांच्यामधील मध्यस्थांचे उच्चाटन करणारे हे पोर्टल पर्यायी बाजारपेठ टूल म्हणून काम करेल असे सांगितले.
शेतकरी आणि निर्यातदार यांच्यामध्ये रोकड विरहित, संपर्क विरहित आणि कागद विरहित इलेक्ट्रॉनिक उद्योग मंच पुरवणी हे पोर्टल पारंपारिक ॲक्वाकल्चरमध्ये क्रांती घडवून आणेल असे त्यांनी सांगितले.
हा मंच अनेक भाषांमध्ये असल्यामुळे तो स्थानिक जनतेलाही सहाय्यकारी होईल.
आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनाशी संबधित हे अजून एक मोलाचे काम असल्याचे सांगत मंत्रीमहोदयांनी हे वेब पोर्टल भारताला आत्मनिर्भर होण्यास मदत करेल अशी खात्री दिली. आपले सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे असेही ते म्हणाले. प्रत्येक उत्पादनाची सविस्तर माहिती ई- सॅन्टा मंचावर उपलब्ध असेल, तसेच त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत NaCSA या Escrow या मध्यस्थ इलेक्ट्रॉनिक पेमेंट व्यवस्थेचा आधार आहे.
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711596)
Visitor Counter : 305