आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

क्षयरोग मुक्त भारत


केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांचे क्षयरोग तंत्रज्ञान कन्सल्टंट नेटवर्कला संबोधन

पोलिओ निर्मूलन आणि व्यवस्थापन यासंदर्भातील जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची केली प्रशंसा

क्षयरोगाचे भारतातून उच्चाटन झाल्यास त्याचा संपूर्ण जगावर सुपरिणाम हर्षवर्धन

Posted On: 13 APR 2021 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी, जागतिक आरोग्य संघटना व राष्ट्रीय क्षयरोगासाठीचे  प्रणालीच्या माध्यमातून क्षयरोग तंत्रज्ञान कन्सल्टंट नेटवर्कला संबोधित केले. या वेळी जागतिक आरोग्य संघटना- SEARO च्या  विभागीय अध्यक्ष पूनम क्षेत्रपाल सिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी डॉक्टर रोड्रिको आफ्रीन हे उपस्थित होते.

वर्ष 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याच्या दिशेने भारताच्या सुरू असलेल्या प्रवासात सहयोग दिल्याबद्दल हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे सुरुवातीला अभिनंदन केले.  भारतीय वैद्यकीय परिषद आणि भारतीय प्रतिबंधात्मक आणि सामाजिक वैद्यक या संस्थांना मदतीचा हात    दिल्याबद्दल व   सध्याच्या  उप- राष्ट्रीय  रोग प्रमाणीकरणाच्या बाबतीत सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला धन्यवाद दिले.

सर्व आरोग्य विषयक बाबींमध्ये जागतिक आरोग्य संघटना सतत होणाऱ्या बदलांची माहिती देणारे उगमस्थान आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने राष्ट्रीय आरोग्य धोरण ठरवण्यासाठी किंवा आयुष्मान भारत वा  डिजिटल हेल्थला चालना यासारख्या योजनाची आखणी करताना नेहमीच मदत केली आहे.

दिल्लीचे आरोग्य मंत्री असताना जागतिक आरोग्य संघटनेसोबत आपली भागीदारी उपयुक्त ठरली असे सांगत भारतातील पोलियो उच्चाटनाच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने बजावलेली कामगिरी कौतुकास्पद होती असे त्यांनी नमूद केले. कोविड संकटात जागतिक आरोग्य संघटने केलेले सहाय्यही त्यांनी नमूद केले.

कन्सल्टंट नेटवर्कने राष्ट्रीय पोलियो निर्मूलन मोहिमेत बजावलेली महत्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. गणतीत येत नसलेले क्षयरोगी व योग्य उपचार यांच्या बाबतीत ती उपयुक्त ठरल्यामुळे आपल्या सार्वजनिक व खाजगी अश्या दोनही आरोग्यव्यवस्था आपल्याला क्षयरोग्यापर्यत पोचण्यास मदत करतात. याशिवाय आमच्या सक्रिय रुग्ण शोध मोहिमा तसेच क्षयरोग रुग्णांसाठी विना शुल्क उपचारांची सुविधा याबाबतीतही त्यांची मदत होउ शकते.  योग्य निदान आणि त्वरित उपचार ही क्षयरोग निर्मूलनासाठीची गुरुकिल्ली आहे . कन्सल्टंट नेटवर्कने आता या रोगात झालेल्या व्यक्ती शोधणे आणि नवीन रोगी तयार होणार नाहीत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे

आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी भारतातून टीबीचे उच्चाटन हे फक्त भारतासाठीच महत्त्वाचे नसून संपूर्ण जगात त्याचे अधिक सखोल परिणाम होणार आहेत यावर भर दिला याशिवाय छोट्या देशांना यामुळे प्रोत्साहन मिळेल असेही त्यांनी सांगितले.

भारतातील क्षयरोग निर्मूलन फक्त भारतातच नाही तर इतरही देशांमध्ये अधिक सखोल परिणाम घडवून आणेल. आणि छोट्या देशांनाही प्रेरणा देईल असे ते म्हणाले.

भारताची क्षयरोग निर्मूलनीसाठी असलेली राजकीय इच्छाशक्ती 2016-2018 यादरम्यानच्या अर्थसंकल्पीय निधीच्या चौपट निधी च्या तरतुदीमुळे दिसून आल्याचे पूनम खेत्रपाल सिंग यावेळी म्हणाल्या.

 

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711518) Visitor Counter : 699