संरक्षण मंत्रालय
शांतीर ऑग्रोसेना या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचा बांगलादेशात समारोप
प्रविष्टि तिथि:
12 APR 2021 10:08PM by PIB Mumbai
शांतीर ऑग्रोसेना - 2021 या 10 दिवसांच्या लष्करी सरावाचा आज म्हणजेच 12 एप्रिल 2021 ला बांगलादेशमधील बंगबंधू सेना निबास ( बीबीएस ) इथे समारोप झाला. 04 एप्रिल 2021ला सुरु झालेल्या या युद्धाभ्यासात अमेरिका , ब्रिटन , रशिया, तुर्की, सौदी अरेबिया, कुवेत आणि सिंगापोर या देशांच्या निरीक्षकांसह चार देशांच्या सैन्याने भाग घेतला.
शांततेत प्रभावीपणे कार्यान्वयन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने , शेजारील देशांमधील संरक्षण संबंध दृढ करणे आणि परस्पर कार्यक्षमता वाढविणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश होता. सर्व सहभागी देशांच्या सैन्याने त्यांचे विस्तृत अनुभव कथन केले आणि बळकट माहिती विनिमय मंचाद्वारे परिस्थितीनिष्ठ जागरूकता वाढविली.
लष्कर प्रमुखांच्या परिषदेच्यापूर्वी, भारतीय सैन्य, रॉयल भूटानी सैन्य, श्रीलंकेचे सैन्य आणि बांगलादेशच्या सैन्याने संयुक्तपणे, मजबूत शांतता कार्यान्वयन या संकल्पनेनुसार आयोजित केलेला लष्करी सराव आणि समारोप कार्यक्रमाने या सरावाची सांगता झाली.
लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी युद्धाभ्यासाच्या समारोप टप्प्याचे अवलोकन केले. 11 एप्रिल 2021 रोजी त्यांनी “जागतिक संघर्षांचे बदलते स्वरूप: संयुक्त राष्ट्र शांतीसेनांची भूमिका” या विषयावर मुख्य भाषण केले. लष्करप्रमुखांनी सहभागी देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर देशांतील लष्करी निरीक्षकांशीही संवाद साधला.
या लष्करी सरावादरम्यान, सैनिकांच्या चमूंनी व्यावसायिकतेच्या सर्वोच्च मानकांचे दर्शन आणि व्हॉलीबॉल, गोळीबार आणि सांस्कृतिक उपक्रमांमधील कौशल्यांचे प्रदर्शन घडविले.
P0G3.jpeg)
***
N.Chitale/S.Chavhan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1711253)
आगंतुक पटल : 317