आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लसीकरणाच्या 85 व्या दिवशी 10 कोटी मात्रांचा टप्पा पूर्ण करत भारताने गाठला मैलाचा दगड


भारत ठरला कोविड-19 लसींच्या 10 कोटी मात्रांचे वेगाने व्यवस्थापन करणारा देश

आज दिवसभरात रात्री 8 वाजेपर्यंत 29 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या

Posted On: 10 APR 2021 10:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021

 

नागरिकांना लसीच्या 10 कोटी मात्रा देत कोविड-19 विषाणूला रोखण्याच्या कामी भारताने अजून एक मैलाचा दगड गाठला आहे.  आज रात्री 8 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार आजपर्यंत देशभरात लसीच्या एकूण 10, 12, 84, 282 मात्रा देण्यात आल्या आहेत.

लसीकरणाची व्याप्ती 45 वर्षे त्यापुढील वयाच्या लोकांसाठी वाढवत त्याशिवाय या वयोगटासाठी सरकारी व खासगी कामाच्या जागी लसीकरणाची सोय करुन देण्यास मुभा असे अनेक महत्वाचे निर्णय, सहयोग व समन्वयाच्या भूमिकेतून केंद्र व राज्यांनी कोविडच्या विळख्यातून मोलाचे जीव वाचावेत म्हणून घेतले.  परिणामकारक औषधोपचार व्यवस्थापनामुळे भारताचा मृत्यूदर जगात सर्वात कमी म्हणजे 1.28% राहिला.

ही बाब सकल समाज या भूमिकेची साक्ष देणारी आहे. अफवा आणि एखाद्याच्या फायद्याच्या हेतूने केलेली दिशाभूल याला बळी न पडता लोकांनी लसीबाबतची उदासिनता सोडून कोविड-19च्या उच्चाटनासाठी व्यवस्थापनाला मदतीचा हात दिला. कोविड-19 मुळे देशातील जोखीम असलेल्या अनेक गटांना संरक्षण देणारी व्यवस्था मिळाली तसेच या गटांचे उच्च् स्तरावरून वारंवार पुनरावलोकन व परीक्षण केले जाईल.

एकूण 10 कोटी मात्रांचे व्यवस्थापन वेगाने व्यवस्थापन करणारा  भारत हा  जगातील सर्वात वेगवान देश आहे.  100 दशलक्ष मात्रा देण्यासाठी अमेरिकेने  89 दिवस तर चीनने 103 दिवस घेतले.

85 दिवसात मिळवलेल्या या यशाची इतर देशांशी तुलना करताना भारताचा प्रतिदिन लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे हे महत्वाचे. अमेरिकेने 85 दिवसांमध्ये 92.09 दशलक्ष मात्रा तर चीनने 85 दिवसात 61.42 दशलक्ष मात्रा दिल्या.

एकूण 15,17,260 सत्रात देण्यात आलेल्या 10.12 कोटी मात्रांमध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 90,03,060 आरोग्यकर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या 55,06,717 आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 99,39,321 कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 47,28,966 कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 45 ते 59वर्षे वयोगटातील  3,01,14,957  लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या  45 ते 59 वर्षे वयोगटातील  6,37,768 लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 3,95,64,741 लाभार्थ्यांचादुसरी मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 17,88,752 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

HCWs

FLWs

Age Group 45-60

years

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

90,03,060

55,06,717

99,39,321

47,28,966

3,01,14,957

6,37,768

3,95,64,741

17,88,752

8,86,22,079

1,26,62,203

आज देशव्यापी लसीकरणाच्या 85 व्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत लसींच्या 29,65,886 मात्रा देण्यात आल्या. तात्पुरत्या अहवालातील माहितीनुसार यापैकी 26,31,119 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर 3,34,767 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.

Date: 10th April 2021 (85th Day)

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

12,581

26,051

66,137

68,029

17,32,688

52,191

8,19,713

1,88,496

26,31,119

3,34,767

 

S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710951) Visitor Counter : 156


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi