संरक्षण मंत्रालय
भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची 11 वी फेरी
Posted On:
10 APR 2021 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021
भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या चर्चेची 11 वी फेरी बैठक 9 एप्रिल 2021 रोजी चुशुल-मोल्दो सीमा बैठक पॉईंटवर झाली.
लडाखच्या पूर्व भागात असलेल्या प्रत्यक्ष सीमा रेषेजवळून सैन्य माघारी घेण्याबाबत उर्वरित प्रश्नांच्या निराकरणासाठी दोन्ही बाजूंनी सविस्तर चर्चा केली. विद्यमान करार आणि शिष्टसंमत नियमाच्या (प्रोटोकॉल) अनुषंगाने अनुत्तरीत प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली गेली. या संदर्भात हे देखील अधोरेखित केले गेले की इतर भागातून सैन्य माघारी पूर्ण झाल्याने दोन बाजूंनी सैन्यामधील तणाव कमी होईल आणि शांतता प्रस्थापित करणे, द्विपक्षीय संबंधात प्रगती करण्यास सक्षम बनवणे याचा मार्ग मोकळा होईल. दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली की त्यांच्या नेत्यांच्या सहमतीने मार्गदर्शन घेणे, उभय देशात संवाद सुरू ठेवणे आणि उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरणासाठी परस्परांना मान्य होणार्या मुद्यावर कार्य करणे आवश्यक आहे. एकत्रितपणे सीमेवर स्थिरता राखण्यासाठी, कोणत्याही नवीन घटना टाळण्यास आणि सीमाभागात संयुक्तपणे शांतता राखण्यास उभयतांनी सहमती दर्शविली.
S.Thakur/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710890)
Visitor Counter : 286