युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते श्रीनगरमधील वॉटर स्पोर्ट्स अकादमीतील नौकानयन खेळासाठीच्या खेलो इंडिया राज्य क्रीडा केंद्राचे उद्घाटन
Posted On:
10 APR 2021 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 एप्रिल 2021
क्रीडा व युवक कल्याण खात्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी आज, 10 एप्रिल 2021 रोजी श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीर स्पोर्ट्स कौन्सिल वॉटर स्पोर्ट्स अकादमी येथे नौकानयन खेळासाठीच्या खेलो इंडिया राज्य क्रीडा केंद्राचे उद्घाटन केले. श्रीनगरच्या दाल लेक येथील नेहरुपार्कमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, जम्मू काश्मीर नायब राज्यपालांचे सल्लागार फारुक खान, जम्मू काश्मीरच्या युवक सेवा विभागाचे सचिव आलोक कुमार हे मान्यवर उपस्थित होते.
“येथील युवा क्रीडापटूंचे आयुष्य बदलण्यासाठी दाल लेकला आलोय याचा आनंद झाला आहे. येथील खेळाडूंमध्ये भरपूर क्षमता आहे आणि क्रीडा मंत्रालय व जम्मू कश्मीर कौन्सिल येथील तरूणांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जम्मू कश्मीरसाठी अनेक योजना आहेत” असे रिजीजू यांनी सांगितले.
23 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात मिळून सध्या एकूण 24 खेलो इंडिया क्रीडा केंद्र कार्यरत आहेत. यातील प्रत्येक क्रीडा केंद्र ऑलिम्पिकमधील एकेका क्रीडाप्रकारासाठी आहे. ऑलिम्पिकमध्ये प्राविण्य मिळवण्याच्या हेतूने सध्या राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशात कार्यरत असलेली केंद्रे जागतिक दर्जाची बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710889)
Visitor Counter : 257